Jump to content

मकरंद साठे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मकरंद साठे हे एक मराठी नाटककार, लेखक व नाट्यदिग्दर्शक आहेत. साठे हे व्यवसायाने आर्किटेक्ट आहेत. असे असले तरी ते, साहित्य अकादमीच्या अनुवादित पुस्तकांच्या २०१७ सालच्या पुरस्कारांसाठीच्या निवड समितीचे सदस्य होते.[][] [] भारतीय रंगभूमीवर नावीन्यपूर्ण, प्रयोगशील आणि मराठी नाटक, साहित्याला नवी दिशा, अशा तिन्ही पातळींवर चपखल बसणारे नाटककार, लेखक म्हणून मकरंद साठे सर्वपरिचित आहेत.थिएटर ॲकॅडमीने १९९० च्या दशकात आयोजिलेल्या एका कार्यशाळेत, 'चारशे कोटी विसरभोळे' या नाटकामुळे मकरंद साठे या नावाचा परिचय झाला. नाटकाच्या नावापासूनच काहीतरी वेगळा आशय मांडण्याचा प्रयत्न साठे यांनी केला. उमेदीच्या काळात प्रयोगशील निर्मिती करणारे अनेक नाटककार कालांतराने ठराविक चौकटीबाहेर पडण्यास धजावत नाहीत; पण बंदिस्त चौकटीत न अडकता प्रयोगशील निर्मितीचा ध्यास घेणाऱ्या काही मोजक्या नाटककारांमध्ये साठेंचा समावेश होतो.

प्रयोगशील वृत्ती, मराठी नाटकाला, साहित्याला नवी दिशा देणे, अशा तिन्ही पातळींवर चपखल बसणारे नाटककार, लेखक म्हणून मकरंद साठे सर्वपरिचित आहेत.

गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ रंगभूमीवर सातत्याने नवनिर्मिती करणाऱ्या पडद्यामागच्या रंगकर्मीर्च अनेक पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला आहे. थिएटर ॲकॅडमीने १९९० च्या दशकात आयोजिलेल्या एका कार्यशाळेत, 'चारशे कोटी विसरभोळे' या नाटकामुळे मकरंद साठे या नावाचा परिचय झाला. नाटकाच्या नावापासूनच काहीतरी वेगळा आशय मांडण्याचा प्रयत्न साठे यांनी केला. उमेदीच्या काळात प्रयोगशील निर्मिती करणारे अनेक नाटककार कालांतराने ठराविक चौकटीबाहेर पडण्यास धजावत नाहीत; पण बंदिस्त चौकटीत न अडकता प्रयोगशील निर्मितीचा ध्यास घेणाऱ्या काही मोजक्या नाटककारांमध्ये साठेंचा समावेश होतो.

नव्वदोत्तर पिढीतील मकरंद साठे हे महत्त्वाचे नाटककारआहेत .हे केव्हाच अधोरेखित झाले आहे. १९८६-८७साली थिएटर अकॅडेमीने पुण्यात आयोजित केलेल्या नवनाटककार कार्यशाळेत साठे यांनी आपले चारशेकोटीविसरभोळे हे नाटक वाचले, तेव्हाच त्यांच्या वेगळ्या लेखनशैलीची चुणूक जाणकारांना दिसली होती. मानवी जगण्यातील असंगततेतून चिरंतन प्रश्नांचा शोधघेण्याचा त्यांचा प्रयत्न रोमनसाम्राज्याची पडझड, सापत्नेकराचं मूल, ठोंब्या, गोळायुगडॉटकॉम यानाटकांमधूनही दिसली. या अॅब्सर्डशैलीच्या नाटकांतूनच थेट सामाजिक वास्तवाला भिडणाऱ्या नाटकांकडे जाण्याची वाटही त्यांनीच निर्माणकेली. ‘सूर्य पाहिलेला माणूस’ हे या टप्प्यावरचे त्यांचे महत्त्वाचे नाटक मानता येईल.

व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या ग्रीक तत्त्वज्ञ सॉक्रेटीसच्या सत्यान्वेषी जगण्याचा पाठ पुरावा करणारे हे नाटक त्यातील डॉ. श्रीराम लागू यांच्या भूमिकेमुळे विशेषत्वाने गाजले. त्यानंतर, पुण्यातील गजबजलेल्या रस्त्यावर ट्रॅफिक ज्यॅम झाल्यानंतर उद‍्भवलेल्या परिस्थितीचे चित्रण करणारे चौक हे रूपकात्मक नाटक आणि ते पुढे गेले हे शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नाला वेगळ्याबाजूने भिडणारे नाटक अशा महत्त्वाच्या लेखनकृती साठेंनी-सिद्ध केल्या आहेत.

एकीकडे नाटककार म्हणून लेखनाचे एक माध्यम हाताळत असतानाचदुसऱ्याबाजूने वैचारिक, चिंतनात्मक लेखन व त्याच्या घुसळणीतून निघालेल्या अच्युत आठवले आणि आठवण आणि ऑपरेशन यमू या कादंबऱ्या लिहून त्यांनी अन्य वाङ्मयप्रकारांतून आपले लेखकीय व्यक्तिमत्त्व अधिक विकसित केले. पेशाने आर्किटेक्ट असलेल्या साठेंचा पिंड चिंतनशील वाचक आणि लेखकाचा अधिक आहे. आजच्या काळातील मल्टिपल आयडेंटिटी क्रायसिसची विविधरूपे तपासणारे त्यांचे वेधक लेख याची साक्ष देतात. त्यांनी काही माहितीपटांचेही लेखन केले आहे. भोवतालच्या वास्तवात घडणाऱ्याराजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडी आणि त्याच वेळीत्याच वास्तवात जन्म घेणाऱ्या कलाकृती यांचे काही एक नाते असते, किंबहुनाते असले पाहिजे या गृहीतकातून मराठी रंगभूमीचा त्यांनी घेतलेला शोध हे त्यांच्या चिंतनशीलतेतून, चिकित्सकवृत्तीतून पडलेले पुढचे महत्त्वाचे पाऊल. त्यातूनच मराठी रंगभूमीच्या तीसरात्री हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिकवाटचालीचा दस्तावेज ठरावेअसे तीन खंडातील ग्रंथलेखन सिद्ध झाले आहे. मराठी साहित्यात ते वेगळे ठरणारे आहे.

मकरंद साठे यांची पुस्तके

[संपादन]
  • अच्युत आठवले आणि आठवण (कादंबरी)
  • ऑपरेशन यमू (नाटक)
  • आषाढ बार (कादंबरी)
  • काळे रहस्य (कादंबरी)
  • गार्डन ऑफ ईडन उर्फ साई सोसायटी (कादंबरी)
  • गोळायुग (नाटक)
  • चारशे कोटी विसरभोळे (नाटक). (इंग्रजीत - Mr. Sapatnekar's Child: & Four Billion Forgetfuls)
  • चौक (नाटक)
  • ते पुढे गेले (नाटक)
  • निवडक निबंध - १, २. रंगभूमी व साहित्य' . (या ग्रंथाला मसापचा शं.ना. जोशी स्मृतिपुरस्कार मिळाला (२८ फेब्रुवारी २०१९)
  • First Proof: The Penguin Book of New Writing from India 6 (सहलेखक - सुनंदा सिकदर, अन्नू जलाईस),
  • Man Who Tried to Remember (मूळ मराठी, इंग्रजी अनुवादक - शांता गोखले)
  • मराठी रंगभूमीच्या तीस रात्री (मराठी नाटकाचा इतिहास, खंड १-२-३).
  • वारंवार कुरुक्षेत्री येताती मनु़्ष्ये (नाटक)
  • सापटणेकरांचे मूल (नाटक)
  • सांस्कृतिक अस्मिता आणि जागतिकीकरण (वैचारिक)
  • सूर्य पाहिलेला माणूस (नाटक)
  • A Socio-Political History Of Marathi Theatre - Set of 3 इंग्रजी पुस्तके

पुरस्कार

[संपादन]
  • 'कृष्ण मुकुंद' पुरस्कार (२०१५)
  • गंगाधर गाडगीळ पुरस्कार (२०११)
  • लोकमंगल साहित्य पुरस्कार (२०१७)
  • शं.ना. जोशी स्मृतिपुरस्कार (२०१९)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Phukan, Vikram. "Q&A | Makarand Sathe". Livemint (इंग्रजी भाषेत). 25 मे 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "साठे मकरंद". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 25 मे 2020 रोजी पाहिले.
  3. ^ Daftuar, Swati. ""I am slightly more comfortable with novels"". The Hindu (इंग्रजी भाषेत). 25 मे 2020 रोजी पाहिले.