Jump to content

मुरुम (त्वचारोग)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या त्वचा विकारात चेह‍ऱ्यावर वेदनायुक्त कींवा वेदनारहीत मुरुम व पुटकुळ्या उत्पन्न होतात, या काही व्यक्तींमध्ये सौम्य तर काहींमध्ये तीव्र स्वरूपाच्या असतात. साधारणत: १३ ते २६ या वयोगटातील तरुणाई या विकाराने जास्त प्रभावीत असल्याने यास पिंपल्स, तारुण्यपिटीका किंवा मुखदुषिका असे म्हणले जाते.

तारुण्यात उत्कट असलेल्या हार्मोन्स व कफ इ.दोषांमुळे चेहऱ्यावरील त्वचेतील तैलग्रंथी(Sebaceous glands) व स्वेदग्रंथींमध्ये जास्त प्रमाणात तैलयुक्त स्त्राव तयार होतो व त्वचा तेलकट पडते हा स्त्राव दिवसेंदिवस वाढतच राहतो व या कालावधीत केलेल्या चुकीच्या आहार विहारामुळे अधिकच घट्ट होत जातो व तेथे(Sebaceous glands) जीवाणुंच्या वाढीसाठी अनुकुल वातावरण तयार होते. वाढलेले जीवाणु हे त्या ग्रंथीचा आकार वाढवुन त्याचे मुख(Pilosebaceous duct) बंद करतात व परिणामी चेहऱ्यावर मुरुम पुटकुळ्या उत्पन्न होतात. तारुण्यपिटीका वाढवण्यात आहारासोबतच कॉस्मेटीक्स,वातावरण, मानसिक तणाव, मलावष्टंभ व ऋतुमान देखिल कारणीभुत असतात. तसेच पित्तप्रकृतीच्या व्यक्तींना तारुण्यपिटीका जास्त भेडसावतात.

तारुण्य पिटीका (पिंपल्स) या त्वचा विकाराला तारुण्याला मिळालेला शाप म्हणले जाते कारण १३ ते २६ वयोगटातील ५० ते ६० % तरुण/ तरुणी या त्वचा विकाराने त्रस्त आहेत. या मुळे पर्सनॅलीटी मधे कमतरता वाटतेच सोबत कॉन्फीडंस सुद्धा कमी होतो म्हणुनच हा विकार तरुणांना शारीरिक व मानसिक कष्ट देतो. टीव्ही शो, चित्रपट, सौंदर्य स्पर्धा यामुळे सतेज व नितळ त्वचा व सुंदर दिसण्याच गोड स्वप्न सर्व तरुणाईच्या विशेषकरून तरुणींच्या मनात असते,  पण बऱ्याच जणांसाठी हे दुरचे व पूर्ण न होणारे स्वप्न ठरते. या त्वचा विकारास प्रमुख कारण असते या वयातील उधानलेली हार्मोन्स, उत्कट झालेले कफ-वात-रक्त दोष व चुकीचा आहार- विहार.

मुरुम
इतर नावे मुरुमांचा वल्गारिस
Photograph of an 18-year-old male with moderate severity acne vulgaris demonstrating classic features of whiteheads and oily skin distributed over the forehead
यौवना दरम्यान १८ वर्षांच्या पुरुषाला आलेले मुरुम
लक्षणे ब्लॅकहेड्स, व्हाइटहेड्स, मुरुम, तेलकट त्वचा, डाग [][]
गुंतागुंत चिंता, आत्मविश्वासाची कमतरता, नैराश्य, आत्महत्येचे विचार [][]
सामान्य प्रारंभ यौवन []
जोखिम घटक अनुवंशशास्त्र []
विभेदक निदान फोलिकुलिटिस, रोझेशिया, हिद्राडेनिटिस सपुराटिवा, मिलिआरिया []
उपचार जीवनशैली बदल, औषधे, वैद्यकीय प्रक्रिया [][]
औषधोपचार अझेलिक ॲसिड, बेंझॉयल पेरोक्साईड, सॅलिसिक ॲसिड, प्रतिजैविक, जन्म नियंत्रण गोळ्या, आयसोट्रेटीनोईन []
वारंवारता 63.3 करोड प्रभावित (२०१५) []

लक्षणे-

-चेहऱ्यावर शाल्मलीच्या काट्यांप्रमाणे पुटकुळ्या उत्पन्न होणे.

-पुट्कुळ्यांच्या ठीकाणी वेदणा, सुज व दाह असणे तसेच चेहरा निस्तेज व काळा पडणे.

-पुट्कुळ्यांच्या मध्यभागी ब्लॅकहेड किंवा व्हाइटहेड तयार होणे.

-पुटकुळ्यांमधुन पु युक्त स्त्राव बाहेर पडणे व चेहरा विद्रूप होणे.

-चेहऱ्याव्यतिरीक्त मान, पाठ यांवर देखिल पुटकुळ्या येतात तसेच डोक्यात कोंडा व खाज येते.

पिटीकांच्या कमी जास्त प्रमाणावरून त्यांच्या ४ ग्रेड केल्या जातात, पुढच्या ग्रेडच्या पिटीका उपचारास कठीण होत जातात.

*ग्रेड १- चेहऱ्यावर ३० किंवा त्यापेक्षा कमी मुरुम/ पुटकुळ्या उत्पन्न होणे.

*ग्रेड २- मुरुम व पु सदृश्य स्त्रावयुक्त पुटकुळ्या उत्पन्न होणे.

*ग्रेड ३- मुरुम, पु व वेदनायुक्त पुटकुळ्या तसेच जुन्या पुटकुळ्यांच्या ठीकाणी छोट्या गाठी तयार होणे.

*ग्रेड ४- पु युक्त स्त्रावी व वेदनायुक्त पुटकुळ्या, सुज व वेदनायुक्त गाठी, चेहरा निस्तेज होणे व कायमस्वरुपीचे काळसर पिटीकायुक्त व्रण चेहऱ्यावर तयार होणे.

कारणे-

आयुर्वेदानुसार तारुण्याच्या काळात होणाऱ्या या त्वचाविकारास कफ, वात व रक्तदुष्टी करणारा आहार-विहार कारणीभुत असतो.

- लवण, अम्ल व क्षारयुक्त पदार्थांचे अतिसेवन. कुळीद, उडीद, तीळ, मुळा यांसारख्या अभिष्यंदी पदार्थांचे अतिसेवन

- मासे, चहा-कॉफी, धुम्रपान,रात्री दही खाणे, उष्ण पदार्थ, अंबवुन बनवलेले खाद्य पदार्थ, दिवसाझोप, रात्री जागरण

- शिळे पदार्थ, फास्ट फुड/ जंक फुड, तळलेले समोसा, वडापाव यांसारखे पदार्थ यांचे अतिसेवन

- विरुद्ध आहार सेवन ( जसे- दुध व फळे एकत्र खाणे)

- केमिकल युक्त कॉस्मेटीक्सचा अतिवापर

- तसेच मलावष्टंभ, मानसिक तणाव, उष्ण- आर्द्रतायुक्त वातावरण व पित्तप्रकृती ही देखिल पिटीका वाढण्यास पोषक कारणे आहेत.

सूचना
खालील माहिती वैद्यकीय सल्ला नाही. कोणत्याही आजारासाठी आपल्या डॉक्टरकडूनच सल्ला घ्यावा.

उपाय

[संपादन]
  1. एक कप दुध चांगले आटवावे . दाट झाल्यावर एक लिंबू पिळून हलवत असताना थंड करावे.रात्री झोपताना याला चेहऱ्यावर लावून चोळावे. रात्रभर लावलेले असू द्यावेसकाळी धुऊन घ्यावे.याने मुरुम बरी होऊन चेहरा उजळून तजेलदार होतो.
  2. मासुरची डाळ बारीक वाटून दुधात घुसळून घ्यावी . आणि चेहऱ्यावर लावावी . १० मिनिटांनी चेहरा धुऊन घ्यावा.आठवडाभर हा उपाय सकाळ-संध्याकाळी करावा.
  3. संत्र्याची साले १०० ग्राम घेऊन वळवून वाटून चूर्ण करावे यात १०० ग्राम बाजरीचे पीठ व १२ ग्राम हळद मिसळून पाण्यात भिजवुन चेहऱ्यावर लावावे. नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा. काही दिवसात चेहरा उजळून निघेल .
  4. गाजराचा रस,टमाट्याचा रस , बीटाचा रस २५-२५ ग्राम दररोज २ महिने पर्यंत प्यायल्याने चेहऱ्यावरची मुरुमे डाग व सुरकुत्या नाहीशा होतात.
  5. लिंबाचा रस गाळलेला , २ तोळे गुलाब अर्क ,२ तोळे गिल्सरीन मिसळून बाटलीत भरून टेवावे.रात्री झोपताना चेहऱ्यावर चोळून लावावे.२० दिवस उपचार केल्याने मुरुम पुटकुळ्या दूर होऊन त्वचा मऊ तजेलदार होते.
  6. दररोज किमान दोनदा आपला चेहरा धुवा. मेकअप वापरणे टाळा आणि तेल मुक्त त्वचेची काळजी घेणारी उत्पादने वापरा.[१०]

संदर्भ

[संपादन]

पुस्तकाचे नाव-घरचा वैद्य

  1. ^ Vary JC (November 2015). "Selected Disorders of Skin Appendages--Acne, Alopecia, Hyperhidrosis". The Medical Clinics of North America (Review). 99 (6): 1195–211. doi:10.1016/j.mcna.2015.07.003. PMID 26476248.
  2. ^ a b Bhate K, Williams HC (March 2013). "Epidemiology of acne vulgaris". The British Journal of Dermatology (Review). 168 (3): 474–85. doi:10.1111/bjd.12149. PMID 23210645.
  3. ^ Barnes LE, Levender MM, Fleischer AB, Feldman SR (April 2012). "Quality of life measures for acne patients". Dermatologic Clinics (Review). 30 (2): 293–300, ix. doi:10.1016/j.det.2011.11.001. PMID 22284143.
  4. ^ Goodman G (July 2006). "Acne and acne scarring - the case for active and early intervention". Australian Family Physician (Review). 35 (7): 503–4. PMID 16820822. 21 April 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
  5. ^ James WD (April 2005). "Clinical practice. Acne". The New England Journal of Medicine (Review). 352 (14): 1463–72. doi:10.1056/NEJMcp033487. PMID 15814882.
  6. ^ Kahan, Scott (2008). In a Page: Medicine (इंग्रजी भाषेत). Lippincott Williams & Wilkins. p. 412. ISBN 9780781770354. 6 September 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
  7. ^ Mahmood SN, Bowe WP (April 2014). "Diet and acne update: carbohydrates emerge as the main culprit". Journal of Drugs in Dermatology (Review). 13 (4): 428–35. PMID 24719062.
  8. ^ a b Titus S, Hodge J (October 2012). "Diagnosis and treatment of acne". American Family Physician (Review). 86 (8): 734–40. PMID 23062156. 18 February 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
  9. ^ GBD 2015 Disease Injury Incidence Prevalence Collaborators (October 2016). "Global, regional, and national incidence, prevalence, and years lived with disability for 310 diseases and injuries, 1990-2015: a systematic analysis for the Global Burden of Disease Study 2015". Lancet. 388 (10053): 1545–1602. doi:10.1016/S0140-6736(16)31678-6. PMC 5055577. PMID 27733282.
  10. ^ "Acne treatment". Dr Niketa Sonavane.