कन्हैया कुमार
कन्हैया कुमार | |
---|---|
जन्म |
जानेवारी 1987 बेगुसराई, बिहार, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | ए. आई. एस. एफ. |
कन्हैया कुमार हा जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष आहे. तो भारतीय कम्युनिस्ट पक्ष ह्याच्या अखिल भारतीय विद्यार्थी फेडरेशनचा एक नेता आहे. फेब्रुवारी २०१६ रोजी, भारताच्या विरुद्ध नारेबाजी केल्याच्या आरोपात त्याच्यवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला अटक करण्यात आली. ते नारे एका मिरवणुकीत काढण्यात आले होते जी कि अफझल गुरूह्याच्या गळफाच्या विरुद्ध होती.[१] २ मार्च २०१६ रोजी पुराव्याचा अभाव असल्यामुळे त्याची जमानत करण्यात आली.[२] कन्हैयाने त्याच्या विरुद्धचे आरोप खोटे असल्याचा दावा केला व सुटका झाल्यावर भारताच्या स्वातंत्र्यावर भाषण दिले. त्यासोबतच विद्यापीठाच्या कुलगुरूंने त्या कार्यक्रमाची तपासणी करण्यासाठी एक समिती बनविली व बोलले कि कार्यक्रमाचे आयोजकांनी परवानगी पद्धतीने घेतली नवहती. विद्यापीठाने आयोजनात असलेल्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली व कन्हैया वर १०००० रुपयांचा दंड लावला.
सुरुवातीचे आयुष्य व राजनीतिक कारकीर्द
[संपादन]कन्हैया ह्याचा जन्म बिहार मधील बेगुसराई जिल्ह्यातील बीहात गावात एका उच्च वर्गीय परिवारात झाला. त्याचे गाव हे तेघरा ह्या मतदारसंघात येते, जिथे कि सी पी आई चांगलेच प्रसिद्ध आहे.[३] त्याच्या शालेय दिवसात त्याने भारतीय लोक नाटक संघटना, एक डाव्या विचाराचा साहित्यिक मंच, ज्याचे उगम भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आहे, मध्ये भाग घेतला. त्याने भूगोलात पाटण्याच्या वाणिज्य विद्यालयामधून पदवीधर केले. तेथेच त्याने विद्यार्थी राजनीतीमध्ये सुरुवात केली.[४] तो ए आई एस एफचा सदस्य झाला व एक वर्षानेच पाटण्याच्या एका परिषदेत त्याने प्रतिनिधित्व केले. त्याने नालंदा महाविद्यालय येथून समाजशास्त्रात स्नातकोत्तर केले व त्यांनतर आफ्रिकन अभ्यास ह्या विषयात विद्यावाचस्पती (पी एच डी) करण्यासाठी जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात त्याची निवड झाली. [५] सप्टेंबर २०१५ रोजी कन्हैया हा जे एन युच्या विद्यार्थी संघाचा अध्यक्ष म्हणून निवडून आला. ए. आई. एस. एफ.चा तो ह्या पदी निवडून आलेला पहिला विद्यार्थी आहे. कन्हैयाचे आत्मचरित्र्य 'बिहार ते तिहार : माय पोलिटिकल जर्नी ' हे पुस्तक हे ऑक्टोबर २०१६ रोजी प्रसिद्ध झाले.
२०१६ राजद्रोह वाद
[संपादन]१२ फेब्रुवारी २०१६ रोजी कन्हैयाला दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली. १३ फेब्रुवारी रोजी त्याच्या वर [[भारतीय दंडविधाना।भारतीय दंडविधान]] अंतर्गक १२४-अ व २२० ब ह्या विभागांवरून खटला दाखल करण्यात आला. अफझल गुरूला दिलेल्या गालफासेच्या शिक्षे कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल लोक सभा सदस्य महेश गिरी व अखिल भारतीय विद्यार्थी परिशदेच्या तक्रारींनंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली. कन्हैयाने त्याच्यावर लावलेल्या दोषांना नकार दिला. एका मुलाखतीत तो बोलला कि जे पण देशविर्रुद्ध नारे लावण्यात आले त्याच्यात त्याचा काही सहभाग नवहता व त्याचा भारताच्या संविधानावर विश्वास आहे. त्याने काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग असल्याचे मत व्यक्त केले. मुलाखतीत तो ह्यावर ठाम होता कि त्याने कोणतेही देशद्रोही वक्तव्य केले नाही.
त्याला झालेल्या अटकेनंतर एक मोठा राजनीतिक वाद उभा राहिला. विरोधी पक्ष नेत्यांने, शिक्षक व विद्यार्थी वर्गाने तीक्ष्ण प्रतिक्रिया दिल्या. जे. एन. यु.चे विद्यार्थी संपावर गेले त्यामुळे विद्यालयाचे व्यवहार बंद झाले.
संदर्भ
[संपादन]- ^ "Why an Indian student has been arrested for sedition".
- ^ Delhi HC gives Kanhaiya Kumar bail quoting Bollywood song and calling slogans an 'infection' "JNU row: Kanhaiya Kumar gets bail and a lesson on thoughts that 'infect… (like) gangrene', Indian Express, 3 March 2016" Check
|दुवा=
value (सहाय्य). - ^ "JNU row: Who is Kanhaiya Kumar?".
- ^ "His college remembers a fiery speaker".
- ^ "My mother is my biggest inspiration: Kanhaiya".