चौका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चौका हे औरंगाबाद जिल्ह्यातील गाव आहे. औरंगाबाद शहरापासून २० किमी अंतरावर असलेल्या या गावाची लोकसंख्या साधारण ५००० आहे. मुख्य व्यवसाय शेती व पशुपालन आहे. अजिंठा लेण्यांकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे गाव असल्या कारणांने या गावाला विशेष महत्त्व आहे. या गावात महिषासुराचे देऊळ (म्हसोबा) आहे.

निजामाच्या राजवटीत या गावाजवळ सैनिकांची चौकी होती. दिल्ली कडे जाणारा एकमेव मार्ग चौका येथून जात होता. या कारणाने या गावास चौका हे नाव पडले.

घनकचरा व्यवस्थापन[संपादन]

महिषासुराच्या देवळात येणाऱ्या लोकांमुळे गावात मोठ्या प्रमाणावर कचरा होतो. या मध्ये प्रामुख्याने प्लास्टिक तसेच थर्माकोल प्लेट यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. याचा निचरा करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील सी आर टी या संस्थेने प्राथमिक सर्वेक्षण करून कचरा व्यवस्थापानाचे प्रशिक्षण गावकऱ्यांना दिले.