समुद्रफळ
समुद्रफळ हा हिंदी महासागराचा आणि पॅसिफिक महासागराचा किनारा तसेच फिलिपाईन्स बेटांवर आढळणारा वृक्ष आहे.
तेथे वाढणाऱ्या या वृक्षाची फळे समुद्राच्या पाण्यावर तरंगत दूरवर गेली व तेथे रूजली. त्याद्वारेहा वृक्ष आग्नेय आशिया, पूर्व आफ्रिका, जपान, ऑस्ट्रेलिया इ. सर्व ठिकाणी आढळतो. देशी बदाम व समुद्रफळामधील फरक मोठ्या वृक्षात स्पष्ट होतो. देशी बदामाच्या फांद्या पसरटच पण ऊर्ध्वगामी, पर्णपिसाऱ्याचा घुमट करू पाहणाऱ्या. फांद्यांचा आणि खोडाचा रंग राखाडी. खोड दिसायला गुळगुळीत,जाड व किंचित ओबडधोबड सालीचे. या देखण्या वृक्षाचा फुलांचा बहार तर अप्रतिमच! याची फुले मोठी साधारण २ ते ३ इंच रुंदीची असतात. किंचित हिरवट रंगाच्या पुष्पकोषातून उमललेल्या २ ते ३ इंच लांबीच्या ४ पांढऱ्या रंगाच्या पाकळ्या असतात. पाकळ्यांच्या आत असंख्य पुंकेसरांच्या तंतूचे रिंगण असते. पुंकेसराचे धागे खालच्या बाजूला पांढऱ्या व वरच्या बाजूला गुलाबी रंगाचा शिडकावा असणारे असतात. आणि त्यातून उभी ठाकलेली एक दांडी. या फुलात मधाचा भरपूर साठा असल्याने पतंग याकडे आकर्षित होतात आणि परगण घडवून आणतात. या परागणाचे फलित म्हणून काही काळानंतर त्या जागी हिरव्या रंगाची फळे दिसायला लागतात. ही फळे आकाराने मोठी साधारण ३ इंच लांब व ३ इंच रुंद, लांबटसर चौकोनी असतात. तळाकडे चारही कोन ठळकपणे दिसतात.
संदर्भ
[संपादन]- वृक्षराजी मुंबईची - डॉ.मुग्धा कर्णिक