अधर्माच्या पाच शाखा
Appearance
विधर्म, परधर्म, आभास, उपमा आणि छल या अधर्माच्या पाच शाखा आहेत. अधर्माप्रमाणेच या सर्वांचाच धर्म जाणणाऱ्या पुरुषाने त्याग करावा.
’विधर्म’
[संपादन]धर्मबुद्धीने करूनसुद्धा ज्या कर्मामुळे आपला धर्म बिघडतो, तो ’विधर्म’ होय.
’परधर्म’
[संपादन]आपल्याखेरीज अन्य माणसासाठी उपदेश केला गेलेला धर्म ’परधर्म’ होय.
’उपधर्म’ किंवा ’उपमा’
[संपादन]पाखंड किंवा दंभ म्हणजे ’उपधर्म’ किंवा ’उपमा’ होय.
’छ्ल’
[संपादन]शास्त्रवचनांचा विपरीत अर्थ लावणे हा ’छ्ल’ होय.
’आभास’
[संपादन]आपल्या आश्रमाहून वेगळ्या धर्माला माणूस स्वेच्छेने धर्म मानतो, तो ’आभास’ होय.
संदर्भ :
श्रीमद् भागवत महापुराण स्कंध-७ वा-अध्याय १५ वा श्लोक १२-१४)