Jump to content

जीवन ज्योती महिला सक्षमीकरण संस्था, आंबवणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्थापना

[संपादन]

ग्रामीण युवतींना व महिलांना सक्षम व सबल करण्याच्या उद्देशाने, स्टरलाईट टेक फाउंडेशन Archived 2017-03-10 at the Wayback Machine. ने पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील आंबवणे या गावी ५ सप्टेंबर २०१४ रोजी 'जीवन ज्योती महिला सक्षमीकरण संस्थे'ची स्थापना केली.

कार्यक्षेत्र

[संपादन]

जीवन ज्योती महिला सक्षमीकरण संस्थेत वेल्हे, भोर या तालुक्यांतील एकूण ७६ गावांतील विद्यार्थिनी प्रशिक्षण घेण्यासाठी येत असतात.

सहभागी गट

[संपादन]

स्टरलाईट टेक फाउंडेशन व ज्ञान प्रबोधनी संस्था

प्रकल्प

[संपादन]

संस्थेमध्ये महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाची मान्यता असलेले खालील प्रशिक्षण वर्ग घेतले जातात -

  1. सर्टिफिकेट कोर्स इन नर्सिंग केर- हा कोर्स एक वर्षाचा असून यामध्ये ६ महिने थिअरी क्लासेस घेतले जातात तर उरलेल्या ६ महिन्यांच्या प्रात्यक्षिक शिक्षणाकरिता हॉस्पिटलमध्ये जावे लागते. विद्यार्थिनीला महाराष्ट्र शासनाचे प्रमाणपत्र मिळत असल्यामुळे तिला नोकरीसाठी पुरेश्या संधी उपलब्ध होतात.
  2. सर्टिफिकेट कोर्स इन टेलरिंग अँड कटिंग - हा कोर्स ६ महिने कालावधीचा आहे. हा कोर्स पूर्ण करून महिला अगदी घरीच्या घरी कपडे शिवून, शिवणकाम करून पैसे कमवून आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकतात.
  3. सर्टिफिकेट कोर्स इन बेसिक फॅशन डिझायनिंग - हा कोर्स ६ महिने कालावधीचा आहे. कोर्स पूर्ण केल्यानंतर युवती व महिला स्वतःचे टेलरिंगचे दुकान सुरू करू शकते किंवा अगदी घरच्या घरी शिवणकाम करू शकते. नोकरी करू शकते.
  4. सर्टिफिकेट कोर्स इन बेसिक ब्यूटी कल्चर - हा कोर्स ६ महिने कालावधीचा असून हा कोर्स पूर्ण केलेल्या युवती व महिला स्वतःचे ब्यूटी पार्लर सुरू करू शकतात. त्यांना नोकरीच्या संधीही उपलब्ध होतात.
  5. सर्टिफिकेट कोर्स इन मायक्रो साॅफ्ट ऑफिस - हा कोर्स ६ महिने कालावधीचा असून महाराष्ट्र शासनाचे प्रमाणपत्र असल्यमुळे सरकारी कार्यालयामध्ये नोकरीची/कामाची संधीही विद्यार्थिनीना मिळू शकते.
  6. सर्टिफिकेट कोर्स इन डेटा एन्ट्री ऑपरेटर - हा कोर्स ६ महिने कालावधीचा आहे. हा कोर्स पूर्ण करणाऱ्या व विद्यार्थिर्नीना नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत.

युवती व महिला यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी संस्थेमध्ये विशेष कार्यशाळा घेतल्या जातात व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

वैशिष्ट्ये

[संपादन]
  • उच्चशिक्षित महिला प्रशिक्षक
  • प्रशस्त जागा
  • आधुनिक यंत्रसामुग्रीची उपलब्धता
  • युवतीना व महिलांना अल्प दरांत प्रशिक्षण
  • योगशाळा
  • ग्रंथालय
  • डेटा प्रोजेक्टरची सोय

कार्यक्रम

[संपादन]
  • नियमित योगकार्यशाळा
  • पोषक आहार
  • तज्ज् मार्गदर्शन
  • युवती मेळावा
  • व्यक्तिमत्त्व विकास शिबीर
  • आरोग्य शिबीर
  • श्रमदान
  • सांस्कृतिक कार्यक्रम

चित्र दालन

[संपादन]

बाह्यदुवे

[संपादन]