सरे व्हिलेज क्रिकेट मैदान
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | सरे व्हिलेज, मग्गोना, कालुतारा जिल्हा |
गुणक | 6°30′46″N 79°59′36″E / 6.51278°N 79.99333°E |
स्थापना | २०११ |
| |
शेवटचा बदल ९ मार्च २०१७ स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर) |
सरे व्हिलेज क्रिकेट मैदान हे मग्गोना, श्रीलंका येथील, २०११ मध्ये खुले झाल्यापासून, प्रथम श्रेणी, लिस्ट अ आणि इतर क्रिकेट सामन्यांसाठी वापरले जाणारे मैदान आहे.
स्थान
[संपादन]मैदान सरे व्हिलेज, मग्गोना येथे समुद्र आणि मग्गोना रेल्वे स्थानकापासून सुमारे १ किमी अंतरावर आहे. मग्गोना कालुताराच्या दक्षिणेस सुमारे १० किमी अंतरावर आहे.
इतिहास
[संपादन]२००४ च्या त्सुनामी मधून बचावलेल्या श्रीलंकेच्या काही नागरिकांसाठी, इंग्लंडमधील सरे काउंटी क्रिकेट क्लब आणि श्रीलंका क्रिकेट मंडळ, एक गाव तयार करण्यासाठी पैसे उभारण्याच्या दृष्टीने एकत्र आले. सरेचे होम ग्राउंड द ओव्हल येथे २० जून २००५ रोजी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू एका ट्वेंटी२० सामन्यात सहभागी झाले,[१] आणि प्रकल्पासाठी सुमारे १० लाख पाऊंड उभारले गेले.[२] वनक्षेत्र साफ करून सरे व्हिलेज नावाचे गाव तयार केले गेले आणि सरेच्या क्रिकेट खेळाडूंची नावे त्या गावातील रस्त्यांना देण्यात आली.[३]
मैदान अधिकृतपणे मे २०११ मध्ये खुले करण्यात आले.[४] तेव्हापासून श्रीलंकेच्या पुरुष, महिला आणि कनिष्ठ खेळाडूंच्या अनेक क्रिकेट स्पर्धा आणि दौरा करणाऱ्या संघांचे सराव सामने येथे खेळवले जातात.[५]
ह्या मैदानावर पहिला प्रथम श्रेणी सामना फेब्रुवारी २०१२ मध्ये बादुरेलिया स्पोर्ट्स क्लब, ज्यांनी ह्या मैदानाला आपले होम ग्राऊंड बनवले आणि मूर्स स्पोर्ट् क्लब यांच्या दरम्यान खेळवला गेला..[६] पहिला लिस्ट अ सामान येथे रागामा क्रिकेट क्लब आणि श्रीलकां एयर फोर्स क्लब दरम्यान डिसेंबर २०१३ रोजी खेळवला गेला.[७]
ह्या मैदानावरील सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या जानेवारी २०१६ मध्ये सिंहलीज स्पोर्ट्स क्लब तर्फे खेळताना मिनोद भानूका ह्याने बादुरेलिया स्पोर्ट्स क्लब विरुद्ध, ३४२ धावा फटकावून स्थापित केली. [८] सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करण्याचा मान बादुरेलियाच्या गयान सिरिसोमा ह्याला मिळाला. त्याने फेब्रुवारी २०१५ मध्ये श्रीलंका एर फोर्स स्पोर्ट्स क्लबविरुद्ध ४६ धावांत ७ गडी बाद केले.[९]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "आंतरराष्ट्रीय XI वि आशियाई XI, २००५". क्रिकेटआर्काइव्ह. ९ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "अ श्रीलंकन व्हिलेज रिबिल्ट – थँक्स टू सरे काउंटी क्रिकेट क्लब". ९ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ माउंटफोर्ड, अॅडम. "सरे इन कॉर्नर ऑफ श्रीलंका". बीबीसी. ९ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "मग्गोनामधील सरे क्रिकेट मैदान खुले झाल्याची समारंभपूर्वक घोषणा". संडे लीडर. 2017-10-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ९ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "सरे व्हिलेज क्रिकेट मैदान येथे खेळवले जाणारे इतर सामने". क्रिकेटआर्काइव्ह. ९ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "सरे व्हिलेज क्रिकेट मैदान, मग्गोना वरील प्रथमश्रेणी क्रिकेट सामने". क्रिकेटआर्काइव्ह. ९ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "सरे व्हिलेज क्रिकेट मैदान, मग्गोना वरील लिस्ट अ क्रिकेट सामने". क्रिकेटआर्काइव्ह. ९ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "बादुरेलिया स्पोर्ट्स क्लब वि सिंहलीज स्पोर्ट्स क्लब, २०१५-१६". क्रिकेट आर्काईव्ह. ९ मार्च २०१७८ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "बादुरेलिया स्पोर्ट्स क्लब वि श्रीलंका एयर फोर्स स्पोर्ट्स क्लब २०१४-१५". क्रिकेट आर्काइव्ह. ९ मार्च २०१७ रोजी पाहिले.