Jump to content

सदस्य:प्रतिक मगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
           शिवसृष्टी किल्ला (अकलूज)

निरा नदीच्या काठी वसलेले सोलापूर जिल्ह्यातील माळशीरस तालुक्यातील अकलूज हे गाव.येथील किल्ला १२११साली यादव घराण्यातील सिंधन राजांनी बांधला.कारण किल्ल्यातील एका शिलालेखावर तशी नोंद अढळते.यादव राजे मुळचे मथुरेचे त्यांचे पुर्वाश्रमीचे नाव जाधव असे होते.

 इ.स १६७९ साली दिलरखान आणि संभाजी महाराज या किल्ल्यावर ४ महिने मुक्कामास होते. या किल्ल्याने यादवांची  जशी राजवट अनुभवली तशी मोघलांची पण  राजवट पेलली.विजापूरच्या दरबारात राजकीय उलथापालथ झाली.बाजाजी नाईक निंबाळकर मोघलाच्या नोकरीत गेले.या किल्ल्याला वेढा दिला तशी नोंद आहे.