चाष
Appearance
माहिती
[संपादन]साधारण ३१ सेमी आकाराचे हे पक्षी विजेच्या किंव्हा टेलिफोनच्या तारेवर बसलेले असतात. यांच्या पंखात फिक्क्या आणि गडद निळ्या रंगाचे पट्टे असतात. पानझाडीची जंगले आणि शेतजमिनींच्या आसपास एकटा किंवा जोडीने राहणारा चाष मोठे किडे, बेडूक आणि सरडेहि खातो. हा पक्षी पंखांची काहीशी संथ पण लयबद्ध उघडझाप करत उडतो. विणींच्या हंगामात नर-मादी चित्तथरारक हवाई कसरती करतात. झाडांच्या खोडात असलेल्या भोकात गावत,चिंध्या केरकचरा गोळा करून घरटं केलं जातं, मार्च ते जलै दरम्यान वीण होते.
नीलकंठ(European Roller)
[संपादन]ही चाष पक्ष्याची एक जात महाराष्ट्रात दिसते, पण क्वचित. नीलकंठ भारतात काश्मीरमध्ये घरटं करतो.
संदर्भ
[संपादन]दोस्ती करूया पक्ष्यांशी. श्री किरण पुरंदरे