Jump to content

महाराष्ट्रातील आयुर्वेद शिक्षण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आयुर्वेद महाविद्यालये या पानावरून पुनर्निर्देशित)

महाराष्ट्रात आयुर्वेदाचे शिक्षण देणारी चार सरकारी, १६ अनुदानित आणि ६० खासगी कॉलेजे आहेत (इ.स. २०१५ची माहिती). या कॉलेजांतून दरवर्षी बी.ए.एम.एस म्हणजे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी ही पदावी घेऊन सुमारे चार हजार डॉक्टर बाहेर पडतात. २०१५ साली महाराष्ट्रात ६० हजारहून अधिक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

कमी खर्चिक

[संपादन]

बीएएमएसचे शिक्षण घेण्यासाठी लोपॅथीच्या अभ्यासक्रमाच्या तुलनेत कमी खर्च येतो.. एमबीबीएसच्या एका वर्षाला सुमारे ११ लाख रुपये खर्च येतो, तर ११ लाख रुपयांत आयुर्वेदाच्या विद्यार्थ्याला पाच वर्षांत आयुर्वेदाची पदवी मिळते. त्यामुळे हे शिक्षण तुलनेत कमी खर्चिक आहे. आयुर्वेद पदवीसाठी प्रवेश घेणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक आहे. मुस्लिम समाजातील तरुण-तरुणींचाही या शाखेकडे कल वाढल्याचे सांगण्यात येते

आयुर्वेदातील पदवी घेताना विद्यार्थ्यांना आधुनिक वैद्यक शास्त्राचे प्रशिक्षणही दिले जाते. त्यांच्यासाठी पॅथॉलॉजी, फार्माकॉलॉजी, रेडिओलॉजी, इन्व्हेस्टिगेशन, सर्जरी अशा विषयाचे अभ्यासक्रमही आहेत.

महाराष्ट्रातील आयुर्वेद डॉक्टरांची आरोग्यसेवा

[संपादन]

महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील आरोग्यसेवेमध्ये आयुर्वेद शाखेची पदवी घेणाऱ्या (बीएएमएम) डॉक्टरांचा मोठा वाटा आहे. १०८ या टेलिफोन क्रमांकावर उपलब्ध होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स सर्व्हिसवर डॉक्टर म्हणून यांच्यापैकी काही डॉक्टर काम करतात. त्याशिवाय अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांत बीएएमएस डॉक्टर आहेत. लहान खासगी हॉस्पिटलमध्ये आरएमओ म्हणून आयुर्वेद डॉक्टर जबाबदारी सांभाळतात. असे असले तरी आयुर्वेद हे अजूनही पर्यायी चिकित्सा पद्धती म्हणून ओळखले जाते. अनेक व्याधींवर ॲलोपॅथीमधील उपचारांचा गुण येत नाही तेव्हा अनेकजण नाईलाजाने आयुर्वेदाकडे वळतात.

इतर पर्याय

[संपादन]

आयुर्वेदामध्ये पदवी घेतल्यानंतर सुमारे ७० टक्के डॉक्टर दवाखाना न उघडता वेगळे पर्याय शोधतात. इन्शुरन्स सेक्टरमध्ये या शाखेचे अनेक डॉक्टर आहेत. इन्शुरन्स कंपन्यांचे बॅक ऑफिस किंवा मेडिकल क्लेम मंजूर करण्याच्या कामाचा पर्याय या डॉक्टरांना उपलब्ध आहे. तर काहीजण क्लिनिकल रिसर्चमधील डिप्लोमा पूर्ण करून औषधांच्या संशोधनात कारकीर्द करतात. काही पदवीधर यूपीएससी, एमपीएससीचा पर्याय निवडतात. पण त्यासोबत आयुर्वेदाचा प्रसार व प्रचार करण्याचे काम सुरूच असते.

हल्ली महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये मसाज व पंचकर्म क्लिनिक मोठ्या संख्येने सुरू झाली आहेत. आयुर्वेदिक बुटिकचेही प्रमाण वाढले आहे. नैसर्गिक औषधे वापरण्याकडे अनेकांचा कल वाढत आहे. त्यामुळे या शाखेची पदवी घेणाऱ्या डॉक्टरांना नवीन व वेगळे क्षेत्र निर्माण झाले आहे.

जिम-फिटनेस सेंटरमध्ये आहारतज्ज्ञ म्हणून अनेकांना नवीन दालन खुले झाले आहे.

महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध आयुर्वेदिक कॉलेजे

[संपादन]
  • मुंबईतील शीवचे (सायनचे) आयुर्वेदिक कॉलेज (स्थापना : २२-२-१९५५)
  • आर्युवेदशास्त्र सेवा मंडळाचे, वैद्य पंचानन गंगाधरशास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय, अहमदनगर (स्थापना : ८ मे १९१७)
  • पुण्याचे अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय
  • पुण्याचे टिळक कॉलेज ऑफ आयुर्वेद
  • शिवाय कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर आयुर्वेद कॉलेज (धुळे), वसंतदादा आयुर्वेद कॉलेज (सांगली), शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय (सोलापूर), हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ आयुर्वेद महाविद्यालय (कोल्हापूर), गंगा एज्युकेशन सोसायटी आयुर्वेद महाविद्यालय (कोल्हापूर), श्रीमती के. सी. अजमेरा आयुर्वेद महाविद्यालय (धुळे), दादासाहेब सुरूपसिंग नाईक आयुर्वेद महाविद्यालय नानगाव (धुळे), किसान ज्ञानोदय मंडळ गुढे आयुर्वेद महाविद्यालय (चाळीसगाव), चैतन्य आयुर्वेद महाविद्यालय (जळगाव), भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय (सावंतवाडी), राधाकृष्ण तोष्णीवाल आयुर्वेद महाविद्यालय (अकोला), विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय (अमरावती), गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालय (अमरावती), डीएमएम आयुर्वेद महाविद्यालय (यवतमाळ), ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय (परतूर), महादेवराव शिवणकर आयुर्वेद कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (गोंदिया), पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील फाउंडेशन आयुर्वेद कॉलेज (शेवगाव), धन्वंतरी आयुर्वेद कॉलेज (उदगीर), आश्‍विन रूरल आयुर्वेद कॉलेज (आश्‍वी बुद्रुक, नगर), रामराव पाटील आयुर्वेद महाविद्यालय (पूर्णा, परभणी), जे. जे. मगदूम आयुर्वेद मेडिकल कॉलेज (कोल्हापूर), महात्मा गांधी आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर (वर्धा), आदित्य आयुर्वेद कॉलेज (बीड), महेश आयुर्वेद कॉलेज (आष्टी, बीड), एसएमबीटी आयुर्वेद कॉलेज (इगतपुरी, नाशिक), महिला उत्कर्ष आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर (वा्शीम), एसएसयूडी आयुर्वेद अँड मेडिकल कॉलेज (वाशीम), के. आर. पांडव आयुर्वेद कॉलेज अँड हॉस्पिटल (नागपूर), शेठ चंदनमल मुथा आयुर्वेदिक महाविद्यालय (सातारा), रूरल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर हॉस्पिटल (मायणी), वगैरे


(अपूर्ण)