चर्चा:राष्ट्रीय छात्र सेना

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
                      NCC चा स्‍थापना दिन, भारत-पाक युध्‍दातही छात्रांचा होता सहभाग

सुकेश (दिव्‍य मराठी वेबटीम)Nov 26, 2014, 09:28 AM IST

लष्करासारखा कडक युनिफॉर्म , कडक शिस्त , अन्यायाच्या विरोधात उभे ठाकण्याची धाडसी वृत्ती, युध्दप्रसंगी रणमैदातही उतरण्याची संधी विद्यार्थ्यांना NCC मधून मिळते. NCC अर्थात राष्ट्रीय छात्र सेना (National Cadet Corps - NCC ) ही भारतातील देशांतर्गत असुरक्षित प्रसंगी नागरी संरक्षण व नागरी सेवकासाठी मोलाचे कार्य करणारी छात्र सेवा संघटना आहे. 26 नोव्हेंबर 1948 ला विशेष कायदा मंजूर करून एनसीसीची स्थापना करण्यात आली. देशातील सर्व बहुतेक शाळा व महाविद्यालयांमधून ही योजना राबवली जाते. भारत-पाक युध्दात NCC छात्रांचे योगदान 1965 आणि 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युध्द घडले. त्याप्रसंगी NCC छात्रांनी प्रत्यक्ष युध्दात सहभाग घेतला. सैनिकांना हत्यार आणि गोळाबारुद पुरविणे, शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये मदत करणे, शत्रूंच्या पॅराटूपर्सवर कब्जा करने, तसेच शहरात गस्त घालण्याचे चोख काम NCC छात्रांनी केले आहे. उद्देश – एन.सी.सी. अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये सैन्याविषयी आवड निर्माण करणे. देशाप्रती आदर, निष्ठा, प्रेम असलेले साहसी युवक तयार करणे हाच या संघटनेचा मुख्य उद्देश आहे. एनसीसी शाळा व महाविद्यालयामध्ये हा विषय वैकल्पिक आहे. NCC मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्याथर्यांना सक्ती केल्या जात नाही. ज्याला सैन्याबद्दल आवड आहे त्या विद्यार्थ्यांना यामध्ये प्रवेश मिळतो. युजीसी, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद आणि सीबीएसई बोर्डाशी संलग्नीत सर्वच शाळा,महाविद्यालयांमध्ये NCC आहे. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणीसुध्दा होत असते. ब्रीद- 'एकता आणि अनुशासन 'हे NCC चे ब्रीद वाक्य आहे. NCC चा इतिहास NCC ची स्थापना सर्वप्रथम जर्मनीमध्ये 1666 मध्ये सुरु झाली. पंडित जवाहरलाल नेहरुंच्या कार्यकाळात ही भारतामध्ये NCC सुरु झाली. भारतामध्ये 1948 च्या भारतीय संरक्षण अधिनियम 1917 नुसार भारतामध्ये NCC सुरु झाली. 1948 मध्येच NCC मध्ये मुलींची तुकडीही सुरु करण्यात आली. 1952 मध्ये एअर विंगसुध्दा NCC ला जोडण्यात आले. भुदल, नौदल आणि हवाईदलासोबत NCC ला संलग्नित करण्यात आले. 1962 च्या भारत-चीन युध्दानंतर देशात NCC चे प्रशिक्षण अनिवार्य केले होते. गणवेश भूदलातील छात्रांना खाकी गणवेश असतो. नौदलातील छात्रांना पांढरा गणवेश असतो आणि हवाई दलातील छात्रांना फिक्कट निळा रंगाचा गणवेश आहे. प्रत्येक कार्यक्रमासाठी आणि प्रशिक्षणासाठी गणवेश आवश्यक असतो. NCC डिव्हिजन NCC मध्ये दोन डिव्हिजन आहेत. त्यामध्ये SD/SW (सिनिअर डिव्हिजन) आणि दुसरी JD /JW (ज्युनिअर डिव्हिजन) . सिनिअर डिव्हिजन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आहे . ज्युनिअर डिव्हिजन शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे. प्रशिक्षण सिनिअर डिव्हीजन आणि ज्युनिअर डिव्हिजनमधील छात्रांना खडतर प्रशिक्षण राहते. शालेय किंवा महाविद्यालयीन कामाच्या दिवसांपैकी 75 टक्के दिवस प्रशिक्षणासाठी आवश्यक मानले जातात. प्रत्येक आठवड्याला चार तास प्रशिक्षण दिले जाते. माणपत्र NCC मध्ये प्रवेशित छात्रांना लेखी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा द्यावी लागते. त्यामध्ये A,B,C अशा स्वरुपाची तीन प्रमाणपत्र परीक्षा असते. C परीक्षा पास झाल्यास छात्राला लष्कर भरतीमध्ये लेखी परीक्षेतून सुट मिळते. प्रमाणपत्र - A : लेखी परीक्षा JD/ JW छात्रांसाठी. इयत्ता आठवी आणि नववी पास केल्यास देता येते. प्रमाणपत्र - B : SD / SW छात्रांसाठी लेखी परीक्षा. 10 किंवा +2, +3 पास छात्रांना ही परीक्षा देता येते. प्रमाणपत्र - C : NCC छात्रांसाठी अत्यंत महत्वाची आणि कठीण परीक्षा असते. A आणि B प्रमाणपत्र पास विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसता येते. NCC छात्रांसाठी आयोजित शिबीरे – प्रजास्ताक दिन संचलन शिबिर Republic Day Camp (RDC) NCC छात्रांसाठी प्रजासत्ताक दिन शिबिर म्हणजे एक पर्वनी असते. अतिशय खडतर परेडनंतर छात्राची निवड होते. प्रथम महाविद्यालय, जिल्हा, राज्य, विभागीय स्तारावरुन निवड झाल्यानंतर त्याला दिल्लीमध्ये राजपथवर संचलन करण्याची संधी मिळते. CATC शिबीर Combined Annual Training Camps (CATC) 10 ते 12 दिवसांच्या या शिबीरामध्ये छात्राला एनसीसी म्हणजे काय, तिचा उद्देश काय आदी एनसीसी विषयी आणि लष्काराविषयी पायाभूत प्रशिक्षण दिले जाते. राष्ट्रीय एकात्मता शिबीर National Integration Camp (NIC) NIC शिबीरासाठी संपूर्ण भारतातून छात्रांची निवड होते. शिबीरामध्ये आलेली छात्र आपापल्या राज्यांची संस्कृती आपल्या कलेच्या माध्यमातून दाखवितात. ख-या अर्थाने भारतातील विविधतेत एकता या शिबीरामधून दिसते. नेतृत्व विकास शिबीर (Advance Leadership Course) एनसीसीमधे प्रवेशीत छात्राचा नेतृत्वविकास होण्यासाठी नेतृत्व विकास शिबीराचे आयोजन केले जाते. प्रत्येक विंगचे वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण आयोजित केले जाते. आर्मी अटॅचमेंट कॅम्प थल सेना कॅम्प

  • (TSC) ऑल इंडिया समर ट्रेनिंग कॅम्प ट्रेकिंग कॅम्प

अविष्कार गिरीश शिंदे, गुरुकुल, महात्मा गांधी विद्यालय, बांद्रा.