आइसलँडएर
Appearance
| ||||
स्थापना | १९३७ | |||
---|---|---|---|---|
हब | रेक्याविक केफ्लाविक विमानतळ | |||
मुख्य शहरे | रेक्याविक, आइसलॅंड | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | सागा क्लब | |||
विमान संख्या | ३६ | |||
पालक कंपनी | आइसलॅंडएर ग्रूग | |||
मुख्यालय | रेक्याविक | |||
संकेतस्थळ | Icelandair.com |
आइसलॅंडएर ही आइसलॅंडची प्रमुख विमानवाहतूक कंपनी आहे. रेक्याविकमध्ये मुख्यालय असलेली ही कंपनी १६ देशांतील ३९ शहरांना विमानसेवा पुरवते. हिचे मुख्य ठाणे रेक्याविक केफ्लाविक विमानतळावर आहे. या कंपनीचा विमानताफा मुख्यत्वे बोईंग ७५७-२००/३०० विमानांचा असून याशिवाय त्यात दोन बोईंग ७६७ विमाने आहेत. आइसलॅंडएरने सोळा बोईंग ७३७ मॅक्स विमानांची मागणी नोंदवलेली आहे. या सगळ्या विमानांना आइसलॅंडमधील ज्वालामुखींची नावे दिलेली आहेत.
आइसलॅंडएर एर आइसलॅंड, आइसलॅंडएर कार्गो आणि लॉफ्टलाइडीर-आइसलॅंडिक या उपकंपन्या चालवते.