हेमा लेले
हेमा सुभाष लेले या माजी प्राध्यापक, अभिनेत्या, कवी, बालसाहित्यकार आणि मराठी लेखिका आहेत.
हेमा लेले यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या रेणुकास्वरूप प्रशालेतून (मुलींच्या भावे स्कूलमधून) झाले. कॉलेजात असताना त्यांनी पुरुषोत्तम करंडक स्पर्धाेत उदय लागू यांच्यासमवेत विजय तेंडुलकरांच्या ‘रात्र’ एकांकिकेमध्ये काम केले होते. त्यानंतर त्यांनी थिएटर ॲकॅडमीच्या तीन पैशांचा तमाशा आणि पडघम या व्यावसायिक नाटकांतही भूमिका केल्या.
कवितांवर आधारित वेळूचे बन आणि बालकवितांचा समावेश असलेल्या चिमणगाणी या कार्यक्रम निर्मितीच्या हेमा लेले या सूत्रधार असत.
मुलांचे संगोपन केल्यावर आलेले अनुभव हेमा लेले यांनी ‘बागडणाऱ्या गुजगोष्टी’ या पुस्तकातून मांडले आहेत.
सुरभी कल्चरल ॲकॅडमीतर्फे हेमा लेले यांच्या विचारांच्या निर्झराकाठी या पुस्तकाचे आणि ई-बुकसह अरे संस्कार संस्कार या मालिकेतील १५ पुस्तकांच्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते झाले होते. (२-३-२०१४)
पुस्तके
[संपादन]- अंतरंग (ललित लेख)
- अरे संस्कार संस्कार (मराठी व इंग्रजी-बालसाहित्य)
- असुर (अनुवादित कथा, मूळ लेखक आनंद नीलकांतन)
- आजच्या मुलांच्या वर्तनसमस्या (वैचारिक)
- आत्मनेपदी (कथा)
- ऐलमा पैलमा (वैचारिक)
- Culturing Capsule (इंग्रजी, बालसाहित्य)
- खरी श्रीमंती (बालसाहित्य)
- गोष्टी गमतीच्या (बालसाहित्य)
- गोष्टी प्राणिमित्रांच्या (बालसाहित्य)
- छोटयांसाठी लोककथा (बालसाहित्य)
- ३ पुस्तके कुमारांसाठी (बालसाहित्य)
- दुसरं आकाश (कवितासंग्रह)
- धाडस जिंकण्याचं! (अनुवादित, मूळ इंग्रजी; डेअर टु विन, लेखक - जॅक कॅनफील्ड, मार्क व्हिक्टर हॅन्सन)
- नव्या नव्या गोष्टी (बाकसाहित्य)
- प्रिय (कवितासंग्रह)
- बागडणाऱ्या गुजगोष्टी भाग १ व २ (बालसाहित्य)
- माझे 'मी' पण (अनुभवचित्रण)
- मी कोण होणार? (बालसाहित्य)
- मुलांची भन्नाट कल्पनाशक्ती (बालसाहित्य)
- मुलांची भाषा (बालसाहित्य)
- मोठ्यांच वागणं छोट्यांच्या नजरेतून (माहितीपर)
- विचारांच्या निर्झराकाठी (ललित)
- क्षण अस्तित्वाचे (कवितासंग्रह)
पुरस्कार
[संपादन]- पार्वतीबाई साठे स्मृति पुरस्कार
- रंगसंगीत प्रतिष्ठान आणि श्यामची आई फाउंडेशनचा काव्य-जीवन गौरव पुरस्कार (जून २०१६)