Jump to content

फ्रॉम जेंडर टू नेशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फ्रॉम जेंडर टू नेशन हे पुस्तक आर. आयव्हेकोव्हिक आणि जे मोस्टोव यांनी संपादित केले असून जुबान इंडिया यांनी २००४ साली प्रकाशित केले आहे.[]

प्रस्तावना

[संपादन]

१९८९ सालानंतर पूर्वीचे सोव्हिएत युनियन आणि युगोस्लाविया यामध्ये ‘राष्ट्र’ आणि लिंगभाव याच्या प्रभावाची चर्चा करण्यात आली आहे. या चर्चेस फाळणीनंतरच्या भारतातील परिस्थितीचा संदर्भ आहे. यातील लेखामध्ये राष्ट्रीयत्व आणि स्त्रीत्व यातील फरक आणि उतरंड हे सके नैसर्गिक आणि आवश्यक आहे याची समिक्षा केली आहे. राजसत्ता, पितृतव आणि, मातृत्वाची लिंगाधारित आणि लिंगभावाधारीत उदाहरणे देऊन त्यांच्या कक्षेतील सत्तेचे वाटप कसे करतात याचा परामर्श लेखकांनी घेतला आहे.

ठळक मुद्दे

[संपादन]

लिंगभाव आणि इंग्भेद हे कसे नैसर्गिक मानले जातात याची चर्चा संपादकांनी आपल्या प्रस्तावनेत केली आहे. एकदा लिंगभेद नैसर्गिक आहे असे मान्य केले की पितृसत्ता आवश्यक आहे असे सिद्धांकन आपोआप येते ही एक ऐतिहासिक प्रक्रिया आहे. अशारितीने लिंगभाव आणि लिंगभेद सर्व प्रकारच्या भेदांवर आणि व्दैतांवर प्रभाव टाकते यामध्ये राष्ट्रीयत्वावरून भेद ही समाविष्ट आहे.

राष्ट्रीयत्वावरून केलेल्या भेदांना मान्यता दिल्यामुळे लिंगभावात्म्क उतरंडीला नैसर्गिक मानले जाते. त्यामुळे कोणत्या राष्ट्राचा अभ्यास करताना राजकीय चर्चा विश्वाचे लिंगभावाच्या दृष्टीकोनातून विश्लेषण केले पाहिजे आणि राष्ट्र व राष्ट्रीयत्व या संकल्पनांचे लैंगिकीकरण कसे केले जाते हे सुद्धा पाहिले पाहिजे. राष्ट्रीयत्व आणि लिंगभाव ही दोन्ही सामाजिक संकल्पना एकमेकांच्या जडण-घडणीमध्ये महत्त्वाच्या आहेत.

राष्ट्र ही संकल्पना लिंगभावात्म्क असते कारण ती स्त्री- पुरुषांच्या पारंपारिक लिंगभावात्म्क श्रमविभागणी जिथे स्त्री हे राष्ट्र असते आणि पुरुष त्याचे संरक्षण आणि संवर्धन करतो. राष्ट्राची ही संकल्पना राष्ट्राला माता, पत्नी किंवा कुमारिका या प्रतिकातून अधिक ठळकपणे समोर येते.

लिंगभाव आणि राष्ट्र यातील परस्पर संबंध अधिक विषद करण्यासाठी संपादकांनी या मांडणीचे काही मुख्य संकल्पनांमध्ये विभाजन केले आहे:

सीमारेषा किंवा सरहद्दी

[संपादन]

ही संकल्पना लिंगभावात्म्क आहे. कारण स्त्रियांची शरीरे ही राष्ट्रीय सीमारेषेची प्रतिके बनतात. सीमेविषयीची काल्पनिक रचिते ही लिंगभावात्म्क असतात कारण देशावर प्रेम केले जाते, त्याला बलवान बनवले जाते, त्याच्यावर बलात्कार, मानखंडणा आणि अतिक्रमण केले जाते. या संदर्भातील सत्तात्मक संघर्ष हे स्त्रियांच्या शरीराशी जोडले जातात. स्त्रियांची लैंगिकता ही राष्ट्रीयत्वासाठी धोकादायक असते कारण ते अतिक्रमणाचे पहिले लक्ष असते. अशा तऱ्हेने स्त्रियांची शरीरे सीमारेषेच्या असुरक्षिततेची प्रतिके बनतात.

समूह आणि समाज

[संपादन]

समूह ही पितृस्त्तेतील एक उभे रचना असून ती वंशावळीवर आधारित असते. ही लोकशाहीचा अभाव असलेली एक उतरंड असते तर, समाज हा एकमेकांशी सरळ संपर्कात असलेल्या व्यक्तींचा बनलेला असतो. कोणताही प्रादेशिक अथवा राष्ट्रीय ओळख असमानतेवर आधारीत असलेल्या भेदभावांना जन्म देते. या ओळखांना सीमा अधिक बंधिस्त करते.

पुरुष आणि समूह

[संपादन]

राष्ट्र संकल्पना पुरुषा-पुरुषांमधील जगाला संरचनात्मक चौकट देते. द्वेलेटीट यांच्या संकल्पनेचा आधार घेऊन पौरुषत्व आणि लष्करीकरण यांचे आदर्श मर्दानगीला जन्म देतात आणि असे हे मर्द पितृसत्ताक समाजात सांस्कृतिक मानदंड बनतात.

व्यक्तित्ववादाची तत्त्वे

[संपादन]

स्त्रिया ह्या एका लिंगात जन्माला येतात आणि सामाजिककिकरणासाठी दुसऱ्या लिंगाकडे आकर्षित होतात तर पुरुष हे दुसऱ्या लिंगात जन्मास येतात आणि आपल्याच लिंगाच्या संरक्षण, संवर्धन याकडे वळतात अशारीतीने व्यक्तित्वाची मुलभूत तत्त्वे तयार होतात. पुनरुत्पादनासाठी राष्ट्राला स्त्रियांची गरज असते पण, या पुनरुत्पादनावरही काही बंधने असावी लागतात या तत्त्वानुसार राष्ट्रवादी असणारे पुरुष राष्ट्रवादी नसणाऱ्या पुरुषांवर सत्ता गाजवतात. याच रीतीने जर स्त्रीया राष्ट्रवादी असतील म्हणजे दुसऱ्या राष्ट्रांना नकार देणाऱ्या असतील म्हणजे तर त्यांनी पुरुषांकडेच सामाजिकदृष्या आकर्षित झाले पाहिजे.

कथिते

[संपादन]

राष्ट्रीय कथिते बंदिस्त असतात. कोणत्याही घटनेच्या अधिकृत वर्णनांमधून यात व्यक्तिमत्त्वाची जडत-घडण केली जाते. त्यामुळे कोणत्याही घटनेचे अधिकुत वर्णन हेच सत्य ठरते आणि दुसरी किंवा पर्यायी वर्णने नाकारली जातात.

दृष्टीकोन

[संपादन]

या विभागात संपादक राष्ट्र आणि लिंगभाव या राचितांमधील गुंतागुंतीचे अंतर-संदर्भ अधिक स्पष्ट करतात. या विभागातील निबंधांमध्ये या ऐतिहासिक परस्पर संबंधांची विशिष्ट उदाहरणे दिली आहेत. जर राष्ट्र पितृसत्तेचे पोषण करत असेल तर पितृसत्तेचा प्रश्न राष्ट्राची संकल्पना नाकारल्याशिवाय सुटणार नाही.

एक उदाहरण घेऊ, रितू मेनन यांच्या ‘डू विमेन हॅव अ कंट्री’ या लीखाला १९४७ साली झालेल्या फाळणीचा संदर्भ आहे. पाकिस्तानची निर्मिती आणि त्यानंतर निर्माण झालेल्या प्रचंड गोंधळाच्या वातावरणाला तोंड देत दोन राष्ट्रांचा जन्म झाला. १९४७ची कहाणी ही स्वातंत्र्य प्राप्तीची कहाणी आहे. त्या सोबतच ती विस्थापन आणि वाताहतीची लिंगभावात्म्क कहाणी आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला जातीय हिंसाचार आणि कुटुंबांच्या परागंदा होण्याचा समावेश होता. नव्याने निर्माण झालेल्या राष्ट्रीय ओळखीमध्ये माणसांना जबरदस्तीने कोंबण्यात आले. विधवा झालेल्या आणि अपहरण केलेल्या स्त्रियांच्या संदर्भातील कार्यक्रम आणि योजनांतून राष्ट्र आणि लिंगभाव हे अधिक स्पष्टपणे समोर आले.

प्रतिसाद

[संपादन]

पद्मिनी स्वामिनाथन यांनी या पुस्तकाचे परीक्षण केले आहे. त्यात त्या म्हणतात, “ह्ताथ करणाऱ्या इतिहासाकडून शक्यतांच्या इतिहासाकडे उतरंडीच्या समान र्च्नेक्डून व्यामिश्र आणि विभिन्न समाजाकडे प्रवास केला तर स्त्रिया कशारीतीने पुन्हा उभ्या राहून सक्षम होऊ शकतात याची अत्यंत अर्थपूर्ण चर्चा हे पुस्तक करते. []

संदर्भ सूची

[संपादन]