एजवर्क क्रिटिकल एसेस इन नॉलेज अँड पॉवर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राज्यशास्त्रज्ञ वेंडी ब्राऊन [१] लिखित सदर पुस्तक हे २००५ मध्ये प्रीन्सेटोन विद्यापीठ मधून ते प्रकाशित झाले. सदर पुस्तकामध्ये काळाच्या विविध टप्प्यांवर प्रकाशित झालेले किंवा लिहिलेले असे एकूण सात शोध निबंध संकलित केलेले आहेत. सर्व लेख एकत्रितपणे विचारात घेतले तर ते राजकीय सिद्धांत व स्त्री अभ्यास या अभ्यास क्षेत्रातील असून ज्ञान निर्मिती, सत्ता व राजकीय टीका असे महत्त्वाचे विषय हाताळले आहेत.[२]

महत्त्वाच्या संकल्पना[संपादन]

पुस्तकाच्या मनोगतामध्ये लेखिकेने आशा व्यक्त केली आहे की, ज्ञान निर्माण करणारे विविध समूह एकमेकांपासून शिकू शकतात आणि स्वतःच्या ज्या कोंडी आहेत त्यामधून निघण्याचे नवीन मार्ग शोधू शकतात. हे लेख संवादात्मक व चर्चात्मक असून आहेत; अर्थात त्यातून कोणत्याही प्रश्नावरील एक उत्तर शोधले आहे असे नाही परंतु प्रश्न आणि ते निर्माण करणारे सत्तासंबंध यांच्यावरील आच्छादन काढणे यासाठी प्रयत्न केले जातात.

सारांश[संपादन]

पुस्तकातील प्रारंभीचे तीन लेख हे ११ सप्टेंबरला झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर अमेरिकेतील राजकीय वर्तुळामध्ये झालेल्या अनेक वादविवाद यावर आधारित आहेत. चौथा लेख हा राजकीय सिद्धांताचे भविष्य यावर भाष्य करणारा असून पाचव्या लेखामध्ये सेन्सॉरशीपबद्दल झालेल्या एक परिषदेबद्दल आहे. सहावा व सातवा लेख हे स्त्री अभ्यास वा लिंगभाव अभ्यास यांच्यातील लेखिकेने म्हणल्यानुसार 'निर्णायक वळण किंवा आणीबाणीचा काळ' यावर प्रकाश टाकणारे आहेत.

Untimeliness and Punctuality: Critical Theory in Dark Times[संपादन]

प्रकरण -१ Untimeliness and Punctuality: Critical Theory in Dark Times यामध्ये राजकीय टीकेसाठी योग्य वेळ किंवा काळ असे काही असते का याबद्दल चर्चा केली आहे. लेखिका अधोरेखित करतात की, पर्यायाने राजकीय टीकेची देखील आवश्यकता असते कारण अशाप्रकारची टीका ही त्या साहित्यामधील महत्त्वाच्या संकल्पनांवर भाष्य करते तसेच संघटीत करणे, निग्रह करणे व शासन करणे' यातील सत्तासंबंध यांसंदर्भात देखील चर्चा केली आहे.

Political Idealization and its discontents[संपादन]

प्रकरण-२ Political Idealization and its discontents राजकीय/ नागरी आत्मीयता/ प्रेम आणि त्यांचे आदर्शिकारानासोबत असणारे संबंध या संकल्पना मांडल्या आहेत. निष्ठा जी देशभक्ती व जहाल मतभेद यांच्यातून निर्माण झाली आहे त्याचा अभ्यास कसा करायचा असा प्रश्न विचारला आहे. ९/११ची घटना झाल्यानंतर राष्ट्रीय एकात्मकतेचे जे वातावरण अमेरिकेत होते त्याबद्दल हा प्रश्न विचारण्यात आला. या अतिरेकही हल्ल्यानंतर अमेरिकेच्या बळी असण्याच्या नवीन अवस्थेच्या काळात बूश यांच्या सरकारला मोठ्याप्रमाणात पाठिंबा मिळाला.

Neoliberalism and the end of liberal democracy[संपादन]

प्रकरण-३ Neoliberalism and the end of liberal democracy यामध्ये बाजारपेठ किंवा नव-उदारमतवादी विवेकवाद यांचा शासनाशी असणारा संबंध, त्यातून निर्माण होणारे 'नागरिक, नागरिकत्वाचे प्रकार आणि वर्तणूक तसेच समाजाची एक नवीन संरचना' या सर्वांचे परीक्षण केलेले आहे.

At the edge: the future of political theory[संपादन]

प्रकरण-४ At the edge: the future of political theory यामध्ये तत्त्वज्ञान आणि राजकीय सिद्धांत यांच्यातील बदलत जाणाऱ्या सीमारेषा यावर चर्चा केली आहे. जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या अनेक घडामोडी या राजकीय सिद्धंकनाच्या बदलत जाणाऱ्या सिमारेशांसाठी कारणीभूत आहेत. तसेच व्यावसायिकीकरण यासारखे घटक देखील त्याला आकार देत असतात. या लेखाच्या शेवटी लेखिका राजकीय सिद्धांताची याची चिकित्सा करतात की, सत्तेचा प्रसार आणि ज्ञानाचे वस्तूकरण व भांडवलीकरण यामध्ये हस्तक्षेप करणे आवश्यक आहे.

Freedom Silences[संपादन]

प्रकरण-५ Freedom Silences यामध्ये आस्थिक तसेच राजकीय मूल्य यांच्यातून मौनाच्या शक्यता याची चिकिस्ता केली आहे. दुय्यमत्वाच्या इतिहासासोबत मौन हे जोडलेले असते परंतु लेखिका नमूद करतात की, त्यातूनच प्रस्थापित सत्तेला आव्हान करण्याच्या शक्यता निर्माण होऊ शकतात.

Feminism unbound[संपादन]

प्रकरण-६ Feminism unbound यात उत्तर-संरचनावादी जागतिक स्तरावर स्त्रीवाद 'घडविण्याच्या शक्यता' यांची चर्चा केली आहे. लिंग आणि लिंगभाव यांचे विश्लेषण यांच्यासोबत स्त्रीवादाची जी सुरुवात झाली त्याच्यापलीकडे स्त्रीवादाने जाणे गरजेचे आहे. सध्या ते अशा अवकाशामध्ये स्थित आहे जिथे क्रांतिकारक क्षितीजाच्या शक्यता नाहीत. लेखिका नमूद करतात की, सध्याचे परिवर्तन हे कालबाह्य (कारण सत्ता ही मोठ्याप्रमाणात विखुरलेली) आणि धोकादायक (जेव्हापासून प्रतीक्रांतीच्या शक्यता या मर्यादित झाल्या आहेत) झालेले आहे. त्यासंदर्भात स्त्रीवादी हे राजकीयदृष्ट्या निष्क्रिय झाले आहेत. खऱ्या सत्तेला धारण करणाऱ्या म्हणून ती स्वतःची कल्पना देखील करू शकत नाही. लेखिका सुचवितात की, पद्धतशीरपणे होणारा जो अन्याय आहे त्याविरोधात आपण टिकाऊ अशी जहाल टीका उभी करणे आवश्यक आहे. ज्यामुळे स्त्रीवादी टीका / समालोचन हे अनेक काळापर्यंत आकारास येणारे, व्यवहार्य, वास्तववादी आणि चांगल्याप्रकारे संघटीत केलेले असे होण्याच्या शक्यता निर्माण होतात. जर आपण असे मानले की क्रांती जी राजकीय नितीमत्ता आहे ती मृत झाली आहे; तर आपण एक मोठे क्षेत्र कोरेच सोडत आहोत. स्त्रीवाद्यांनी काल्पनिक जग हे संकल्पित केले आहे; ज्याची दखल ही क्रांतीच्या यंत्रणेच्या अभावामध्ये घेतली जाऊ शकते.

The Impossibility of Women’s Studies[संपादन]

प्रकरण-७ The Impossibility of Women’s Studies यामध्ये आजच्या काळात स्त्री अभ्यासाचे जे संस्थानिकरण झाले आहे त्यावर टीका केली आहे. स्त्री अभ्यासाने इतर ज्ञान शाखांसोबत (उदा. वांशिक अभ्यास, सांस्कृतिक अभ्यास, क्विअर सिद्धांत इ.) देखील होड घेणे किती महत्त्वाचे आहे हे लेखिका सतत नमूद करतात. या सर्व ज्ञान शाखांनी एकमेकांसोबत संवाद प्रस्थापित करणे आवश्यक आहे. स्त्री अभ्यासाच्या वर्गामध्ये ज्ञान नक्की कशाला म्हणाले जाते आणि अध्यापन करण्यास कोणाला पात्र ठरविले जाते हा या लेखाचा केंद्रस्थानी असलेला महत्त्वाचा चर्चेचा विषय आहे. लेखिका म्हणतात की, स्त्री अभ्यासाचा इतिहास बघता व त्यातील अर्थ तसेच ज्ञान याबद्दलची चधाओढ बघता विद्यापीठांमध्ये नवीन पदवी अभ्यासक्रम सुरू करणे व त्यावर पुनर्विचार करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. जरी यासाठीचा पर्याय हा अस्पष्ट असला तरीदेखील लेखिका असे सुचित करतात की, अकादमिक समूह हा अस्पष्टतेचा काळ स्वतःचे सखोल मनन करण्यास व विचार करण्यासाठी वापरू शकतात.

प्रतिक्रिया[संपादन]

सदर पुस्तकातील लेख हे काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर महत्त्वाच्या विषयांवर बोलणारे आहेत. २००५ मधील रॉबिन विएग्मन यांनी The Possibility of Women’s Studies हे त्यांचे काम लेखिकेचा The Impossibility of Women’s Studies या लेखातील अकॅडमिक अभ्यासकांना केलेल्या आव्हानाला अनुसरून लिहिलेला आहे.[३] ज्यामध्ये स्त्री अभ्यासातील अभ्यासक्रमांचे महत्त्व उलगडले आहे. स्त्रीवादी अभ्यासक ब्रेंडा वेबर यांनी त्यांच्या २००९ मधील Makeover TV: Selfhood, Citizenship and Celebrity या पुस्तकात ब्राऊन यांच्या मांडणीपासून उद्धृत केले आहे की, नव-उदारमतवादी शासन आणि त्यातील नागरिक यावर चर्चा केली आहे.[४]

संदर्भ सूची[संपादन]

  1. ^ "Wendy Brown | UC Berkeley Political Science". polisci.berkeley.edu (इंग्रजी भाषेत). 2018-03-24 रोजी पाहिले.
  2. ^ Brown, Wendy (2005-12-11). Edgework: Critical Essays on Knowledge and Politics (इंग्रजी भाषेत). Princeton University Press. ISBN 0691123616.
  3. ^ http://www.sfu.ca/~decaste/OISE/page2/files/Wiegmanwomenstuds.pdf
  4. ^ Weber, Brenda R. (2009-10-30). Makeover TV: Selfhood, Citizenship, and Celebrity (इंग्रजी भाषेत). Duke University Press. ISBN 0822391236.