पत्‍नी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एक पुरुष आणि एक स्त्री ह्यांच्यात विवाह संस्कार संपन्न होताना त्या दोघांमध्ये निर्माण होणाऱ्या नवीन नात्यात ती स्त्री तिने ज्याच्याशी विवाह केला त्या पुरुषाची पत्‍नी हे नाते प्राप्त करते. "पत्‍नी" हे नाते प्राप्त केल्याने त्या स्त्रीस त्यायोगे त्या नात्यास अनुसरून येणारे अधिकार तथा कर्तव्ये प्राप्त होतात. तसेच त्यायोगे ती स्त्री सामाजिक आचारविचारांच्या यथायोग्य स्वातंत्र्य तसेच बंधनास प्राप्त होते. कुटुंबामध्ये पत्‍नीचा सहभाग हा फार महत्त्वाचा असतो.