न.का. घारपुरे
Appearance
डॉ. प्रा. नरहर काशीनाथ घारपुरे (१ मे, इ.स. १९०४) हे एक जर्मन भाषा जाणणारे मराठी लेखक होते. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात ते जर्मन शिकवीत. ते एम्.ए. एल्एल्.बी. असून त्यांनी जर्मनीहून पीएच्.डी. मिळवली होती.
त्यांच्या स्मरणार्थ पुण्यातील सरस्वती मंदिर संस्थेच्या आधी पूना इंग्लिश स्कूल असे नाव असलेल्या शाळेला डॉ. न.का. घारपुरे प्रशाला असे नाव देण्यात आले.
न.का. घारपुरे यांनी लिहिलेली पुस्तके
[संपादन]- आमोक ऊर्फ वेडापिसा (लघुकादंबरी, मूळ लेखक स्टीफन झ्वाईग)
- गृहपाश - सुंडरमानच्या हेरमान (Sundermann, Hermann)च्या हायमाट (१९८३) या नाटकावर आधारित
- जर्मन वाङ्मयाचा इतिहास (१९७३)
- जुना बहर
- विकास की विचका ?
- समग्र किर्लोस्कर (१९३५, वाङ्मय समीक्षाग्रंथ, संपादित, सहसंपादक - य.गं. लेले)