विकिपीडिया:विशेष सजगता/4
"तटस्थ दृष्टिकोन" हे विकिपीडियाच्या समावेशिताबद्दलच्या गाभ्यातील तीन धोरणांपैकी एक आहे. "पडताळणी पात्रता" आणि "मूळ संशोधन नको" ही अन्य दोन आहेत.
तटस्थ दृष्टिकोन हे विकिमीडियाचे एक मूलभूत तत्त्व आणि विकिपीडियाचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. विकिपीडियावरील सर्व लेख आणि इतर विश्वकोशीय मजकूर तटस्थ दृष्टिकोनातूनच लिहिला गेला पाहिजे. मजकूर शक्यतोवर पूर्वग्रहांशिवाय लिहिलेला आणि विश्वासार्ह स्रोतातून मिळवलेला असावा. तो लिहिताना त्यात प्रकाशित झालेल्या सर्व महत्त्वाच्या दृष्टिकोनांचे उचित प्रतिनिधित्व झालेले असले पाहिजे. याच्याशी तडजोड नाही आणि सर्व लेखांत, आणि लेखांच्या सर्व संपादकांकडून हे अपेक्षित आहे.
विकिपीडियाचा दृष्टिकोन निष्पक्षपाती आहे. लेखातील विषयाबद्दल प्रचलित असणारे प्रमुख दृष्टिकोन संतुलित व निष्पक्षपाती पद्धतीने वाचकांपुढे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. आम्ही एखाद्या गोष्टीचा पुरस्कार करण्याचे टाळतो आणि वादग्रस्त मुद्द्यांवर वादप्रतिवाद करण्याऐवजी वादग्रस्त मुद्द्यांच्या पैलूंचा परामर्ष घेतो. काही वेळा एखाद्या विषयाबद्दल एकच सर्वमान्य दृष्टिकोन असू शकतो; मात्र इतर अनेक वेळा आम्ही विषयाशी संबंधित अनेक दृष्टिकोन मांडतो व त्यांतील एखाद्या दृष्टिकोनालाच "सत्य" किंवा "योग्य" म्हणून पुरस्कारण्याऐवजी ते त्या-त्या संदर्भांत नेमकेपणे सादर करतो. या उद्दिष्टानुसार, सर्व लेखांमधील माहिती पडताळण्याजोगी अचूक हवी : संदर्भस्रोत न नोंदवलेली सामग्री / आशय वगळला जाऊ शकतो; त्यामुळे संदर्भस्रोत जरूर नोंदवा. संपादकांचे वैयक्तिक अनुभव, अन्वयार्थ किंवा विचारसरणी यांना इथे स्थान नाही. त्यामुळे पडताळण्याजोगा व विश्वसनीय / अधिकृत संदर्भस्रोत नोंदवणे - विशेषकरून वादग्रस्त विषयांवर किंवा जिवंत व्यक्तींविषयी लिहिताना - अत्यावश्यक आहे. निष्पक्षपातीपणाबद्दल वाद उद्भवल्यास संबंधित लेखाच्या चर्चापानावर चर्चा करावी.
विकिपीडिया ही आचारांची अथवा विचारांची युद्धभूमी नाही.