विकिपीडिया:लोकमत समुदायास पाठवण्याकरिता लेख
To, Editor Lokmat Group Publications & TV Channel
Maharashtra
Dear editor,
Please find an article by undersigned for lokmat group publication and TV channels.Undersigned request you to publish the same as special feature article in your sunday suplement. Hope this would be an interesting reading and viewing for your esteemed readers and viewers.
Undersigned would be gratefull to you if you consider following article.As an editor you are free to add reduce change any or all parts of the article including that of criticism in your editorial capacity.
Thanks and Regards
मराठी विकिपीडियाचे ध्येय आता १,११,१११ लेखांचे
तुम्हाला माहित आहेका कि जगातील सर्वांत अद्ययावत आणि सर्वांत मोठा विश्वकोश कुणी लिहिला याचे नेमके उत्तर देता येत नाही ? अशा विश्वाचे स्वप्न पाहा की ज्यात प्रत्येक मनुष्यमात्र संपूर्ण ज्ञानाच्या गोळाबेरजेत मुक्तपणे देवाणघेवाण करू शकेल. तशी आमची बांधीलकी आहे. हे विचार आहेत विकिपीडियाचे जनक, जिमी वेल्स यांचे. इंटरनेटचे महत्त्वाचे साधन संगणकीय युगाला उपलब्ध झाल्या नंतर इंटरनेटचा मानवी समाजाला उपयोग होण्यात ज्यांनी मोठा हात भार लावला त्यात आज विकिपीडिया मुक्त ज्ञानकोशाचा वेबसाईटचा समावेश आहे आणि विकिपीडिया कुणा एका व्यक्तिने नाही तर इंटरनेटवर लेखन करणार्या लाखो स्वयंसेवकांनी लिहिला आहे. इंटरनेटबद्दल विरोधात अवाजवी प्रमाणात टिका करणार्या सर्वांनाच विकिपीडियाच्या यशाने पुन्हा एकदा विचार करावयास लावला कारण विकिपीडियाने तरूण पिढी सकारात्मक रचनेत मागे नाही आणि अवाढव्य असेही काम निस्वार्थीपणे पार पाडून नेऊ शकते हे सिद्ध केले आहे.
प्रसिद्ध मराठी संत समर्थ रामदास म्हणतात -- आपणासी जे जे ठावें, ते दुसर्यांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन. मराठी विकिपीडियासाठीच जणू त्यांनी हे लिहून ठेवले होते! बिनधास्तपणे आपल्यास अवगत असलेल्या ज्ञानाच्या परिचयाचा लाभ स्वयंसेवी सहकारी पद्धतीने इंटरनेट आणि विकिपीडिया वापरून इतरांना करून देत आहेत.
विकिपीडिया हा विकिपीडिया वाचकांनीच एकत्रितपणे इंटरनेट वर संपादित केलेला मुक्त ज्ञानकोश आहे. हे विकी संकेतस्थळ (वेबसाइट) आहे याचा अर्थ कुणीही (अगदी तुम्हीसुद्धा, ) ह्या संकेतस्थळाची बहुतेक पाने/लेख 'संपादन' लिहिलेल्या कळीवर टिचकी मारून संपादन सुरू करू शकता.
विकिपीडिया (www.wikipedia.org) हा एक मुक्त ज्ञानकोश आहे. विकीतंत्रज्ञानावर आधारीत मिडीयाविकी हे सॉफ्टवेर वापरून हा ज्ञानकोश तयार केला आहे. विकिमिडीया फाउंडेशन ही विनानफ्याच्या तत्त्वावर चालणारी संस्था ह्या ज्ञानकोशाच्या व्यवस्थेचे आणि नियंत्रणाचे काम पाहत आहे. प्रत्येक भाषेतील विकिपीडियाचे काही सदस्य प्रबंधक/प्रशासक नात्याने आपापल्या भाषेतील विकिपीडियांचे सुसूत्रीकरण करतात.
हा मुक्त ज्ञानकोश जगातील सर्व भाषांमध्ये लिहिला जात आहे, मराठीचा पण यात समावेश आहे. या मुक्त ज्ञानकोश चे वैशिष्ट्य ह्या ज्ञानकोशाचे कुणीही सहज संपादन करू शकते. इंग्लिश विकिपीडिया १५ जानेवारी २००१ ला सुरू झाला तर मराठी विकिपीडियाची स्थापना १ मे २००३ ला झाली. आजतागायत इंग्लिश विकिपीडियात २५ लाखापेक्षा जास्त लेख लिहिले गेले आहेत आणि त्यात अजूनही वृद्धी होत आहे. जगातील सर्व आर्थिक दृष्ट्या सबळ असलेल्या देशातील भाषांनी यात मोठी मजल मारली आहे. जपानी, जर्मन, फ्रेंच भाषेतल्या विकिपीडियांनी ५ लाखाहून लेखांची मजल केव्हाच ओलांडली आहे तर चिनी, कोरियन, अरेबिक इत्यादी भाषांतील विकिपीडियांनी एक लाखाची मजल ओलांडली आहे. केवळ भाषा प्रेमाच्या गप्पा न करता सकारात्मक ध्येय साधणार्या इतर देशीयांकडून नक्कीच काही गुण घेण्या सारखे आहेत हे निश्चित. या पार्श्वभूमीवर स्वतःला संगणक आणि अग्रेसर समजणाऱ्या भारत देशातील भाषा भगिनी मात्र खूपच मागे आहेत. असे असूनही या भाषांतील विकिपीडियावर काही लोक अत्यंत नि:स्वार्थीपणे स्वतःचा अनमोल वेळ आणि बुद्धिमत्ता मानवी जनकल्याणाकरिता एक पैशाची अपेक्षाही ना करता कारणी लावत आहेत, यात (मोजकेच का होईना ) मराठी बांधव व भगिनी यास सक्रिय हातभार लावत आहेत पण केवळ त्यांचे प्रयत्न पुरेसे ठरणार नाहीत कारण मराठी विकिपीडियानेसुद्धा ११-११-२०११ पर्यंत एक लाख अकराहजार एकशे अकरा चांगले लेख बनवण्याचे ध्येय स्वीकारले आहे आणि म्हणूनच त्यांना हवे आहे इंटरनेट वापरता येणार्या प्रत्येक मराठी भाषिकाकडून थोडे थोडे योगदान.
सध्या मराठी विकिपीडियावर सर्व विषयावर थोडे थोडे लेखन उपलब्ध असलं तरी त्यात क्रीडा विषयावर चांगलं लेखन झालं आहे, सूर्यमाला, मराठवाडा इत्यादी बद्दल आत्मीयता असलेल्या संपादकांनी विषयांबद्दल वेगळी दालनेसुद्धा बनवली आहेत. तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही विषयाबद्दल माहिती देऊ शकता मग ती तुमची भाषा देश राज्य किंवा तुमचा गाव किंवा तुमची शाळा किंवा महाविद्यालयसुद्धा.
विकिपीडियाशिवाय, बहुभाषी डिक्शनरीकरिता विक्शनरी, मुळदस्तावेज पुस्तके पाण्डूलिपी आणि स्रोत इत्यादीकरिता विकिस्रोत, तर नवीन पुस्तकांच्या निर्मितींकरिता विकिबुक्स, अवतरणांच्या संचयाकरिता विकिक्वोटस, बातम्यांकरिता विकिन्यूज, चित्र छायाचित्र ध्वनी आणि चलचित्रमुद्रीका आणि इतर फाइल्सच्या संचयाकरिता विकिकॉमन्स इत्यादी सहप्रकल्पांसोबतच विकिमिडीया फाऊंडेशन विकिस्पेसिज नावाचा जैवकोशाचा पण कणा आहे.
विकिमिडीया फाउंडेशन तिच्या संकेतस्थळांच्या सुसूत्रीत व्यवहाराच्या दृष्टीने मेटाविकी निती नियमावलींचे चर्चा व नियमन करते, मिडीयाविकी संकेतस्थळावरून सॉफ्टवेअर डेव्हलपर लोकांचे व वापरणाऱ्यांचे कार्य चालते तर विकिमिडीया फाउंडेशनचे स्वत:चेपण संकेतस्थळ आहे जेथे प्रवेश मर्यादित स्वरूपातच उपलब्ध केला जातो. मिडीयाविकी सॉफ्टवेअरच्या इतर भाषांत भाषांतरणाचे काम ट्रांस्लेट विकीत होते आणि सॉफ्टवेअर संबंधित सूचना आणि तक्रारींची दखल बगझीला येथे घेतली जाते.
तुम्ही मिडीयाविकी सॉफ्टवेअर स्वत:चे मराठीतील स्वतंत्र संकेतस्थळ घडवण्याकरितासुद्धा वापरू शकता अथवा चक्क या सॉफ्टवेअरच्या डेव्हेलपमेंटमध्ये सहभाग घेऊ शकता.
विकिपीडिया हा मुक्त माहिती स्रोत आहे माहिती वाचण्यास, वापरण्यास पैसे लागत नाहीत. अर्थात माहितीचा तारतम्याने वापर करणे अपेक्षित आहे कारण ही माहिती काही वेळा चुकीची असू शकते. मुद्रणाधिकार असलेली माहिती सुयोग्य परवानगीशिवाय येथे वापरणे अपेक्षित नसले तरी काही नवागतांच्या चुकीमुळे असे घडले तर असा मसुदा लगेच आपण स्वत:सुद्धा गाळून टाकू शकता. लेखांमध्ये सहज परस्पर संदर्भ देता येतात. उदाहरणार्थ, तुम्ही संदर्भ येथे टिचकी मारून संदर्भ या शब्दाबद्दल माहिती पाहू शकता.
विकिपीडियावरील लेख शोधाभ्यासासाठी अवलंबून राहण्याइतपत खात्रीलायक असतील हे नक्की नसते. परंतु एखाद्या संकल्पनेबद्दल इतरांची मते सहजपणे तौलनिकदृष्ट्या अभ्यासता येतात. अभ्यासाची किंवा शोध निबंध संकल्पनेची आणि शोधांची सुरुवात करता येते.
विषयांचा परिघ सामान्य ज्ञानकोशापेक्षा व्यापक असतो. अत्यंत छोट्या भाषेतील भाषासमूहातील लोकांकडच्या छोट्यात छोट्या माहितीचे संकलन शक्य होते. अधिकाधिक संपादनानंतर कालपरत्वे लेख परिपक्व होत जातात. वेगाने बदल करणे सहज शक्य असल्यामुळे अद्ययावत माहिती उपलब्ध असू शकते.
विकिपीडियावरील लेख पुनः पुनः आढावा घेऊन संपादित होतात त्यामुळे प्रत्येक आवृत्तीगणिक त्यातील एकांगीपणा कमी होण्यास मदत होते. कालांतराने तर्कनिष्ठता वाढू शकते. विकिपीडियातील लेखांनी सर्व संबंधित बाजूंचा सर्वसमावेशक तपशील देणे अपेक्षित असते.
छापील मजकुरासाठी आवश्यक असलेली कागदाची मर्यादा नसल्यामुळे मजकूर त्रोटक आणि विस्तृत- दोन्ही स्वरूपात उपलब्ध करून देता येतो. मग अश्या या मराठी विकिपीडियास सर्वगूण संपन्न बनवण्याकरिता आजच भेट देणारना! त्यांचा संकेतस्थळ पत्ता आहे.http://mr.wikipedia.org/wiki/