शिवलिंगराव जगदेवराव देशमुख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रावबहादुर शिवलिंगराव जगदेवराव देशमुख हे विजापूर जिल्ह्यातीतल्या सिंगडी तालुक्यातील अलमेल परगण्याचे इनामदार होते. त्याशिवाय ते जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष आणि विजापूरमधील ऑनररी मॅजिस्ट्रेट्स बेंचचे चेरमन होते. १९११ साली ते रावसाहेब झाले आणि १९३५ मध्ये रावबहादुर झाले.

सन्मान आणि पुरस्कार[संपादन]

  • कॉरोनेशन मेडल
  • दुसऱ्या महायुद्धात सैन्यभरतीसाठी साहाय्य केल्याबद्दलचे प्रमाणपत्र. हे प्रमाणपत्र त्यांना हिंदुस्थानच्या कमांडर-इन-चीफ यांच्या हस्ते मिळाले. (३ एप्रिल, १९१९)

जिल्हा स्काउट कमिशनरपदावर नियुक्ती (६ नोव्हेंबर, १९२६)

  • १९३०-३१ मधील सविनय कायदेभंगाच्या चळवळीदरम्यान ब्रिटिशांना केलेल्या मदतीबद्दल प्रशस्ती पत्र
  • विजापूरमधील लिंगायत एज्युकेशन असोसिएशनचे अध्यक्षपद
  • विल्सन दुष्काळ-प्रतिबंध संस्थेचे सदस्यत्व