बाळशास्त्री हुपरीकर
Appearance
बाळशास्त्री अण्णाबुवा हुपरीकर (?? - ७ ऑगस्ट, इ.स. १९२४) हे कोल्हापूर येथे राहणारे संस्कृत पंडित व लेखक होते. ते वेदान्तशास्त्राचे आणि ज्ञानदेव- शंकराचार्य यांच्या साहित्याचे अभ्यासक व भाष्यकार होते. मराठी कवी रेंदाळकर हे त्यांच्याकडेच 'सिद्धान्त कौमुदी' शिकले.
बाळकृष्ण हुपरीकरांनी लिहिलेले ग्रंथ
[संपादन]- श्रीअनुभवामृत पर्यबोधिनी टीका (१८९८)
- (हर्बर्ट स्पेन्सरसाहेबांची) अज्ञेय मीमांसा व आर्य वेदान्त
- ग्रंथमाला (सहलेखक - विष्णू गोविंद विजापूरकर)
- श्रीमद्भगवद्गीता अथवा ज्ञानयोगशास्त्र
- विद्यारण्य व ज्ञानेश्वर यांच्या वेदांतील मतांचे तात्पर्य (१९०२)