Jump to content

लीला मर्चंट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लीला मर्चन्ट (जन्म : तळेगाव ढमढेरे, २४ मार्च १९२४) या एक स्वातंत्र्यसैनिक आहेत. त्यांचा जन्म एका सेवाभावी धार्मिक कुटुंबात झाला. बाळपणापासूनच त्यांना गरिबांविषयी आत्मीयता, सेवाभावी वृत्ती व सामाजिक बांधिलकीचे बाळकडू मिळाले. भारताला स्वातंत्र्यपूर्व काळापासून पुण्याच्या ससून रुग्णालयात डॉ. रतिलाल मर्चंट काम करत होते. त्यांच्याशी लग्न झाल्यानंतर तर त्यांनी लीलाताईंच्या समाजकार्याला प्रोत्साहनच दिले.

डॉ मर्चंट यांचा साने गुरुजींशी स्नेहसंबंध होते. त्यामुळे लीलाताईंनाही साने गुरुजींचा सहवास मिळाला. त्यामुळे १९४२ च्या ’छोडो भारत" आंदोलनात लीला मर्चन्ट यांनी भूमिगतांसाठी काम केले. परदेशी वस्तूंची होळी, हरिजन मंदिर प्रवेश, अस्पृश्यता निवारण यांपासून ते भूदान कार्यापर्यंत त्यांचा सक्रिय सहभाग होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही त्यांनी भाग घेतला होता.

महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने सुरू केलेली सूतकताई लीलाताई अजूनही करतात. स्वातंत्र्य चळवळीतील आणि सामाजिक क्षेत्रांतील त्यांच्या कामामुळे त्यांवा जवाहरलाल नेहरू, धोंडो केशव कर्वे, लालबहादूर शास्त्री यांच्यासारख्या मोठ्या लोकांशी त्यांचा संबंध आला.

पुणे शहरात आलेला पानशेतचा पूर, दुष्काळ, भूकंप, दंगली, जाळपोळ अशा नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी लीलाताई मर्चन्ट सर्वसामान्यांच्या आधारवड झाल्या. महिला व गरीब लोकांसाठी त्यांनी केलेल्या समाजसेवेमुळे लीला मर्चंट यांना पुणेकरांनी १९६२ आणि १९६८ च्या निवडणुकांत महापालिकेवर निवडून दिले. पुण्याच्या महापालिकेवर निवडून जाणाऱ्या गुजराती-मारवाडी समाजातील त्या पहिल्या महिला होत्या. त्यानंतर पुण्याच्या कसबा मतदार संघातून त्या काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आल्या..

सध्या लीला मर्चंट वयाच्या ९१व्या वर्षी निवृत्त जीवन जगत आहेत.