वैश्य सोनार
वैश्य सोनार ही महाराष्ट्रामधील एक जात आहे. वैश्य सोनार ही महाराष्ट्रातिल मराठी भाषक सोनारातील एक उपजात आहे. ही उपजात साधारणतः १८५४ नंतर उदयास आली व १९०२पर्यंत मान्यता पावली. साधारणतः नागपूर प्रांत, वऱ्हाड व खाणदेशात या लोकांची वस्ती पसरलेली आहे. मूळचे देशस्थ यजुर्वेदी असलेल्या लोकांनी सोनारकी व्यवसायात आगमन केल्यामुळे ते सोनार म्हणून मान्यता पावले आहेत व पुढे त्यांची शीरगिनती सोनारातच झालेली आहे. यांचे देव, देवक, कुळाचार व गोत्र ब्राह्मणांप्रमाणेच आहेत. ह्या लोकांत जातिय बंधने सैल असली तरीही धार्मिक पगडा अद्यापही आहेच. इतर क्षेत्रात नोकरी व्यवसायामुळे कार्यरत असले तरीही सोनार व्यवसायात भरपूर परिवार आहेत. पुर्वी ह्या समाजाचे निवाडा बुऱ्हाणपूरातील ब्राम्हण करित पण, आता ती व्यवस्था राहीली नाही. नागपुरात रेशिमबाग येथे या समाजाची मुख्यसंस्था कार्यरत असुन तेथेच त्यांचे मुख्यालय आहे. सर्वप्रथम या समाजाची माहिती केतकर कृत विश्वकोशात संपादित करण्यात आलेली आहे.