विकिपीडिया:सदर/जुलै ४, २००५
Appearance
आयुर्वेद हे भारतातील प्राचीन वैद्यकशास्त्र आहे. सुमारे तीन हजार वर्षांची ज्ञात परंपरा या वैद्यकशास्त्रामागे आहे. चरक संहिता आणि सुश्रुत संहिता हे दोन ग्रंथ आयुर्वेदाचा मूलाधार आहेत. चरक संहितामध्ये महर्षि चरक यांनी स्थापित केलेल्या परंपरेतील ज्ञानाचा सारांश आहे तर सुश्रुत संहिता ही महर्षि सुश्रुत यांच्या परंपरेची प्रतिनिधी आहे. या वैद्यकशास्त्रानुसार शरीरातील सर्व घडामोडी पित्त दोष, कफ दोष, वात दोष या त्रिदोषांमुळे होतात आणि शरीरातील आजारपणा या दोषांमध्ये संतुलन बिघडल्यामुळे होतो. हे संतुलन पुनर्स्थापित केल्यानंतर ती व्याधी दूर होते. संतुलित आहार (पथ्ये, इत्यादि) आणि नैसर्गिक औषधे यावर आयुर्वेदामध्ये भर दिला जातो.