युरिपिडिस
Appearance
युरिपिडिस (इ.स.पू. ४८५? - इ.स. ४०६?) इ.स.पू. पाचव्या शतकातील ग्रीक नाटककार होता. जन्म ख्रिस्तपूर्व ४८५ च्या सुमारास , मृत्यु ख्रिस्तपूर्व ४०६ च्या सुमारास युरिपिडिसने एकूण ९२ नाटके लिहिली . त्यातील १९ नाटके सध्या अस्तित्वात आहेत. त्याच्या समकालीन समिक्षकांनी त्याच्या नाटकातल्या साध्या, गबाळ्या नायकांबद्दल अन् अकुलीन, चारित्र्यहीन नायिकांबद्दल त्याची निंदा केली. अशा धर्तीची पात्रे रंगविल्याने शोकांत नाटकांच्या उदात्त व पवित्र प्रतिमा मलिन होताता हा त्या काळच्या कर्मठ समिक्षकांचा दावा होता. सर्व सामान्य प्रेक्षकांनी मात्र युरिपिडीसच्या सर्व नाटकांचे मनापासून स्वागत केले. युरिपिडीसच्या मृत्यूनंतरही त्याच्या नाटकांची लोकप्रियता कमी झाली नाही. नाट्यशास्त्राच्या इतिहासात युरिपिडिसला आधुनिक युरोपियन शोकांत नाटकांचा जनक मानले जाते.