Jump to content

वॉरन बफे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वॉरन बफे
Warren Buffett
जन्म वॉरन एडवर्ड बफे
३० ऑगस्ट, १९३० (1930-08-30) (वय: ९४)
ओमाहा, नेब्रास्का, Flag of the United States अमेरिका
राष्ट्रीयत्व अमेरिकन
पेशा बर्कशायर हॅथवेचे प्रमुख अधिकारी
निव्वळ मालमत्ता ६२ अब्ज अमेरिकन डॉलर्स
स्वाक्षरी

वॉरन बफे (इंग्लिश: Warren Buffet) हे एक अमेरिकन गुंतवणूकदार व उद्योगपती आहेत. बफे ह्यांना जगातील सर्वोत्कृष्ट गुंतवणूकदार मानण्यात येते. वॉरन बफे हे बर्कशायर हॅथवे ह्या गुंतवणूक कंपनीचे अध्यक्ष व प्रमुख अधिकारी आहेत. २००८ साली बफे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते तर २०११ साली ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

ओमाहा ह्या शहरामध्ये जन्मलेल्या बफे ह्यांनी वयाच्या १५व्या वर्षापासून शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. गर्भश्रीमंत असताना देखील आपल्या काटकसरी जीवनशैली व साधे राहणीमान जगणाऱ्या बफे ह्यांनी आपल्या संपत्तीच्या ९९ टक्के भाग परोपकारी कामांसाठी दान केला आहे.

वॉरन बफे यांचे विचार

[संपादन]
  1. कधीही एका इन्कम सोर्सवर (उत्पन्नाच्या स्रोतावर) अवलंबून राहू नका. त्याची गुंतवणूक करा आणि दुसरे इन्कम सोर्स (उत्पन्न स्रोत) निर्माण करा.
  2. किंमत जी तुम्ही देता, मूल्य जे तुम्हाला मिळते.
  3. जर तुम्ही तुम्हाला गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल तर लवकरच तुम्हाला तुमच्या गरजेच्या गोष्टी विकण्याची वेळ येणार आहे असा समजा.
  4. खर्च करून शिल्लक राहिलेले पैसे वाचवू नका, तर पैसे वाचवून जे शिल्लक राहते ते खर्च करा.
  5. आपल्या दोन्ही पायांनी कधी पाण्याची खोली मोजू नका.
  6. एक टोपल्यात तुमची सर्व अंडी ठेवू नका..
  7. जेव्हा आपल्याला माहीत नसते की आपण काय करतो आहोत, तेव्हाच धोका निर्माण होतो .
  8. मी श्रीमंत बनणार आहे हे मला माहीत होते. त्याबद्दल माझ्या मनात एका मिनिटासाठीही कधी शंका आली नाही.
  9. नियम क्र.१ : कधीही तुमचे पैसे गमावू नका. नियम क्र. २ : कधीही नियम क्र.1१विसरू नका.
  10. स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक म्हणजे सर्वात महत्त्वाची गुंतवणूक
  11. प्रामाणिकपणा हे खूप महागडी वस्तू आहे, त्याची हलक्या लोकांकडून अपेक्षा करू नका
  12. मी एक चांगला निवेशक आहे कारण मी एक व्यापारी आहे आणि मी एक चांगला व्यापारी आहे कारण मी एक निवेशक आहे.
  13. नेहमी दीर्घकालीन गुंतवणूक करा.
  14. आज कोणीतरी झाडाच्या थंड सावलीमध्ये बसलेला आहे, कारण ते झाड खूप पूर्वी कोणी तरी लावलेले होते.
  15. पैशाची बचत करण्यासाठी वयाची गरज नसते.
  16. जितक्या लवकर चांगल्या ठिकाणी पैसा गुंतवता येईल तितक्या लवकर पैसा गुंतवा.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

बाह्य दुवे

[संपादन]