भारतीय नृत्यशास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सध्या अस्तित्वात असलेल्या भारतीय नृत्यपरंपरांचे शास्त्र हे इसवी सनाच्या पहिल्या शतकात रचलेल्या भरतमुनिरचित नाट्यशास्त्र या नावाने ओळखले जाते. नाट्य या शब्दातच नृत्याचा आणि संगीताचा समावेश होतो. त्यामुळे नाट्य व संगीत या विषयांवरील जवळजवळ सर्वच जुन्या संस्कृत ग्रंथांत नृत्याबद्दल विचार आढळतो. रस , भाव आणि व्यंजक( अभिनय) इ.नी युक्त असलेले ते नृत्य म्हटले जाते.नृत्य ही एक ललित कला आहे.**

भारतीय नृत्यशास्त्रावरील अभिजात संस्कृत ग्रंथ[संपादन]

  • अभिनयदर्पण (नंदिकेश्वर)
  • अभिनवभारती (अभिनवगुप्त लिखित नाट्यशास्त्रावरील टीका)
  • नाट्यदर्पण ((लेखक रामचंद्र-गुणचंद्र)
  • नाट्यशास्त्र (लेखक भरतमुनी)
  • नृत्यरत्‍नावली (लेखक जायसेनापती)
  • मानसोल्लास ((लेखक सोमेश्वर)
  • संगीतरत्नाकर (लेखक शार्ङ्‌गदेव)
  • संगीतसमयसार (लेखक पार्श्वदेव)
  • संगीतसारामृत (लेखिका तुलजा)

नृत्यशास्त्रावरील आधुनिक ग्रंथ[संपादन]

  • नृत्यात्मिका (लेखिका डॉ. सुचेता भिडे-चापेकर)
    • भारतीय संस्कृती कोश खंड पाचवा