Jump to content

ध्वनिप्रदूषण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ध्वनिप्रदूषण म्हणजे प्राणी, मनुष्य, यंत्र यांच्यामुळे वातावरणात निर्माण झालेल्या व इतर मनुष्य किंवा प्राणी यांना बाधा पोचविणाऱ्या आवाजामुळे निर्माण झालेली स्थिती. ध्वनिप्रदूषणाचे मुख्य स्रोत परिवहन प्रणाली, आवाज करणारी यंत्रसामग्री, लोकांचा गोंगाट, वाद्यांचे आवाज वगैरे असे आहे. या व्यतिरिक्त गाड्यांचे हॉर्न, सायरन, फटाके, गिरण्यांचे भोंगे, ध्वनिवर्धकांचे आवाज, रेडिओ-दूरचित्रवाणी संचांतून बाहेर पडलेले आवाज या सर्व गोष्टी ध्वनिप्रदूषण वाढण्यास मदत करतात. विविध मीडियांमुळे आवाजाचा गोंगाट वाढला आहे आणि त्याचा विपरित परिणाम दिसून येतो.

मानवी आरोग्यावरील परिणाम

[संपादन]

ध्वनिप्रदूषणामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य या दोघांवर परिणाम होतो. ध्वनिप्रदूषणामुळे शारीरिक व मानसिक ताण वाढतो, मनुष्य चिडचिडा आणि आक्रमक होतो. त्याला झोप लागत नाही म्हणून त्याचे मानसिक संतुलन बिघडते व माणूस वेडापिसा होतो. ध्वनिप्रदूषणामुळे रक्तदाब वाढतो व हृदयरोगाला आमंत्रण मिळते. कारखान्यांत मोठ्या आवाजाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना म्हातारपणी बहिरेपणा येतो, म्हणजेच ध्वनिप्रदूषणामुळे हळूहळू बहिरेपणा येतो. हृदयरोग असलेली व्यक्ती मोठमोठ्या ध्वनिवर्धकाच्या आवाजाने दगावण्याची शक्यता असते. गर्भवती स्त्रीच्या गर्भालाही ध्वनिप्रदूषणामुळे हानी पोहचू शकते. सणासुदीमध्ये स्पीकरच्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते.

विमानतळाजवळ असलेल्या घरांच्या भिंतींना विमानाच्या आवाजाने तडे पडतात. ध्वनिप्रदूषणाचा जनावरांवरसुद्धा हानिकारक प्रभाव पडतो. सैन्याच्या पाणबुडीत वापरल्या जाणाऱ्या सोनार (sonar) या ध्वनिलहरींमुळे व्हेल ह्या प्रजातीच्या काही जातींचे मासे मृत्युमुखी पडतात.

आवाज व ध्वनिच्या तीव्रतेचे आरोग्य समस्यांमध्ये रोजच वाढतंय. एका आरोग्य सर्वे नुसार अधिक ध्वनिच्या ठिकाणी काम करणारी माणसे चिडचिड असतात. ध्वनिप्रदूषणामुळे रक्तदाब सुद्धा वाढतो. डोकेदुखी वाढते. बहिरेपणा येऊन कानाचे आजार देखील होतात. प्रमाणापेश्या जास्त ध्वनिमुळे “निरोसिस ” होतो. आज मुंबई हे जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर बनले आहे.

ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण), नियम, २०००

वाहनांची वाढती संख्या, औद्योगिकीकरण, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, वेगवेगळ्या कारणांसाठी होणारे स्टेज शो अशा विविध कारणांमुळे ध्वनिप्रदूषणाची समस्या वाढत आहे. या समस्येवर नियंत्रण --59.94.1.10 ०८:१६, २२ जानेवारी २०१४ (IST)तिरप्या मुद्राक्षरातील मजकूरकरण्यासाठी हे नियम बनविण्यात आले.

यामधील नियम ५ व ६ आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम, १९८६मधील कलम १५ अन्वये ध्वनिप्रदूषणाच्या मर्यादेचे उल्लंघन केले जात असेल तर त्यासाठी पाच वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेतील तरतुदीप्रमाणे ध्वनिप्रदूषणाचा गुन्हा दखलपात्र व अजामीनपात्रही आहे.

नियंत्रणासाठी उपाय

[संपादन]
  • मुंबईतील वाढते ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी उड्डाणपूल व इलिव्हेटेड रोडवर आवाज प्रतिबंधके लावली गेली आहेत. पुलांच्या कठड्यांभोवती फायबरचे सात फूट उंचीचे अडथळे उभारले की आवाजाची तीव्रता कमी होते. इमारत व उड्डाणपूल यांच्यातले अंतर ३० मीटरपेक्षा कमी असेल तर फ्लायओव्हरच्या दोन्ही बाजूला सात फूट उंचीची आवाज प्रतिबंधके उभारली जातात.
  • भारतात सर्वोच्च न्यायालयाने कानठळ्या बसविणाऱ्या १२५ डेसिबल्सपेक्षा मोठा आवाज करणाऱ्या फटाक्यांवर बंदी घातली आहे.

जनजागृती

[संपादन]

महाराष्ट्र

[संपादन]

राष्ट्रीय हरित लवाद, पश्चिम विभाग, पुणे यांनी वाहनांमध्ये लावण्यात येणाऱ्या हॉर्न्स, सायरन्स यासाठीची योग्य ती मानके अधिसूचित करण्याचे निर्देश दिले आहेत.[] वाहतूक पोलिसांनी 'नो हॉर्न डे' असे उपक्रम राबवले आहेत. ठाण्यात एके दिवशी कर्कश हॅफझार्ड हॉर्न वाजवून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या ६ हजार १९५ वाहनचालकांवर कारवाई झाली.

  1. ^ http://www.mpcb.gov.in/images/pdf/MIS_2014_CR71.pdf