Jump to content

ज्ञानयोग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जीव,जगत व परब्रह्म यांचे यथार्थ ज्ञान शास्त्रांच्या अभ्यासाने व गुरूच्या साहाय्याने करून घेऊन त्यावरून ब्रह्म ऐक्य जाणणे आणि अनुभवणे याला ज्ञानयोग म्हणतात.न ही ज्ञानेन सदृशं पवित्रं इह विद्यते म्हणजे ज्ञानासारखे पवित्र इथे काहीही नाही असे गीतेत (४.३८) सांगितले आहे. हे पवित्रतम ज्ञान तत्त्वदर्शी गुरूच्या साहाय्याने स्वतः स्वतःच अनुभवायचे असते. ज्ञान मिळविण्यासाठी तत्त्वदर्शी गुरूकडे नम्रतेने जायला हवे.अहंकारी मनुष्याला ज्ञान प्राप्त होण्याचा संभव नाही.ज्ञानप्राप्तीसाठी साधकाला तीव्र जिज्ञासा असली पाहिजे आणि त्याने गुरूची सेवा करीत योग्य समयाची वाट पाहिली पाहिजे.ज्ञानासाठी श्रद्धेची नितांत आवश्यकता आहे.बुद्धीनिष्ठा ही एक प्रकारची श्रद्धाच आहे. ज्ञानयोगाला तत्परताही आवश्यकता असते.[]

आध्यात्मिक महत्त्व

[संपादन]

प्रा.खानोलकर यांनी ज्ञानयोगाच्या स्वरूपाचे वर्णन केले आहे ते असे-मानवी जीविताचे मर्म ज्यांना समजले आहे,जीविताच्या पाठीमागचा हेतू ज्यांना आकलन झाला आहे,शरीर-मन-बुद्धी यांचा विकास होवून ज्यांच्या ठिकाणी स्थितप्रज्ञवृत्ती स्थिर झाली आहे,निष्काम कर्मयोग ज्यांना साधला आहे त्यांनाच बुद्धियोग साधतो ,ज्ञान प्राप्त होते,तेच भगवंताला प्रिय होतात . हाच ज्ञानयोग होय.[]

भगवद्गीततेतील संकल्पना

[संपादन]

गीतेत ज्ञानयोगालाच बुद्धियोग असे नाव दिले आहे.या योगात शरीर व मन यांच्यापेक्षा बुद्धीचा संबंध जास्त येतो.बुद्धीने आत्म स्वरूपाची खरी ओळख करून घेणे म्हणजे ज्ञान मिळविणे होय.या बुद्धीयोगाचे महत्त्व गीतेत अनेक जागी सांगितले आहे.

त्तात्त्विक संकल्पना

[संपादन]

ज्ञानाचा अधिकारी होण्यासाठी मुमुक्षूने म्हणजे मोक्षाची इच्छा असणा-याने प्रथम चार साधने संपादित केली पाहिजेत.नित्यानित्यविवेक,इहामुत्रफलभोगविराग .यमनियम व मुमुक्षुता ही ती चार साधने होत. ज्ञानयोगाच्या सात भूमिका असून शुभेच्छा,विचारणा,तनुमानसा, सत्त्वापत्ती, असंसक्ती, पदार्थभावना व तुर्यगा अशी त्यांची नावे आहेत.[]

हे ही पहा

[संपादन]
  • ज्ञानयोग-स्वामी विवेकानंद (रामकृष्ण मिशन प्रकाशन)
  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड दहावा
  2. ^ भारतीय संस्कृती कोश खंड दहावा
  3. ^ भारतीय संस्कृती कोश खंड दहावा