राजा अंपत बेटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राजा अंपत बेटे (किंवा ४ राजे) हा इंडोनेशियातील द्वीपसमूह म्हणजे निसर्गसौंदर्य आणि पौराणिक कथा यांचा अनोखा संगम आहे.

इंडोनेशियाच्या पश्चिम पापुआ प्रांतात आणि न्यू गिनीच्या ’बर्ड्‌स हेड द्वीपकल्पा’च्या वायव्येला हा सुमारे १५०० छोट्या बेटांचा समूह आहे. त्यांतली ९०० बेटे म्हणजे वाळूचे बंधारे किंवा प्रवाळाचे खडक आहेत. या समूहाच्या मधोमध मिसूल, सालवाटी, बटांटा आणि कोफिआऊ ही चार मोठी बेटे आहेत.

पौराणिक कथा[संपादन]

एका स्त्रीला ७ अंडी सापडली. पक्व झाल्यावर ती फुटली आणि त्यांतून चार पुरुष बाहेर पडले आणि हे त्या चार मोठ्या बेटांचे राजे झाले. शिवाय एक स्त्री, एक भूत आणि एक दगड बाहेर पडला; त्यांचे पुढे काय झाले ते कथेत सांगितले जात नाही.

भूगोल[संपादन]

ही बेटे जगातल्या १० सर्वोत्कृष्ट ’डायव्हिंग डेस्टिनेशन्स’पैकी एक मानली जातात. या बेटांपैकी मिसूल बेटावर अद्‌भुत समजली गेलेली प्रस्तरचित्रे आहेत. पाण्याखालच्या असंख्य आणि विविध जीवांचा येथील रहिवास जगातील पहिल्या क्रमांकाचा आहे.

जैवविविधता[संपादन]

राजा अंपत बेटे आणि त्यांच्या आजूबाजूचा समुद्र हे जगातले सर्वात चांगले जैवविविधता असलेले स्थळ आहे.

प्रवाळजीवन[संपादन]

राजा अंपत बेटे ही इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स पापुआ न्यू गिनी, सॉलोमन बेटे आणि पूर्व टिमोर या प्रदेशाने बनलेल्या प्रवाळ त्रिकोणात येतात. त्यामुळे इथली प्रवाळी जीवसृष्टी ही जगातल्या अन्य ठिकाणांच्या मानाने चांगली टिकून आहे.

पहा[संपादन]