विकिपीडिया:आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन - २००६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फेब्रुवारी २१ हा दिवस जगभर मातृभाषा दिन म्हणून पाळला जातो.


या दिवशी प्रत्येक सुशिक्षित (व काही अशिक्षित सुद्धा) माणूस आपल्या मातृभाषेच्या विकासासाठी काही क्षण खर्च करतो. जसे तुम्ही!! मराठी मुक्त ज्ञानकोशाला भेट देउन तुम्ही मराठी भाषेला अंतर्जालावर प्राधान्य देण्याचे ठरवले, त्याबद्दल धन्यवाद. आपण याहुनही अधिक योगदान देउ शकता. येथे आपण आपल्या मनाजोगत्या विषयावर लिखाण करून मराठी मुक्त ज्ञानकोश व त्याद्वारे मराठी भाषेला अधिकाधिक समृद्ध करू शकता. यासाठी येथे [[१]] टिचकी द्या.


सर्व विकिपिडियन व ईतर मंडळींना कळवण्यास आनंद वाटतो की आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या मुहुर्तावर मराठी मुक्त ज्ञानकोश हा भारतीय भाषांतील सगळ्यात जास्त लेख असलेला मुक्त ज्ञानकोश झालेला आहे[[२]]!! आता आपला सहयोग लाभला की उत्तरोत्तर प्रगती होईलच!!


दिसामाजी काहीतरी ते लिहावे,

प्रसंगी अखंडीत वाचीत जावे. -- समर्थ रामदास