गदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हातात गदा असलेल्या हनुमानाचे चित्र

गदा म्हणजे हातात धरण्यास दांडा असलेले व त्यावर वजनदार गोळा असलेले एक शस्त्र असते. हे शस्त्र शत्रूवर ताकदीने प्रहार करण्यासाठी वापरले जाते. आधुनिक काळात या शस्त्राचा वापर सहसा होत नाही. काही प्रसंगी समारंभ-सोहळ्यांमध्ये सन्मानदर्शक राजचिन्ह म्हणून गदा मिरवली जाते. मात्र जुन्या जगाच्या इतिहासात आणि पौराणिक कथांमधील संदर्भांवरून ऐतिहासिक काळात हे महत्त्वाचे शस्त्र असावे, असे वाटते. विष्णू, हनुमान, भीम इत्यादी हिंदू पुराणांतील व्यक्तिरेखांनी हे शस्त्र वापरल्याचे उल्लेख आढळतात.

संरचनेनुसार गदांचे अनेक प्रकार आढळतात : चपटे मुख असलेली गदा, गोळ्यावर कंगोरे किंवा पाती असलेली गदा, इत्यादी.

गदा
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत