१९९३ महिला क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१ ऑगस्ट १९९३ रोजी इंग्लंडच्या लंडन शहरातील लॉर्ड्स येथे महिला क्रिकेट विश्वचषकाच्या पाचव्या आवृत्तीच्या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला गेला. ही लढत इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ आणि न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ या दोन संघांमध्ये झाली. हा न्यू झीलंडचा पहिलाच महिला क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना होता. यजमान इंग्लंडने अंतिम सामना ६७ धावांनी जिंकत १९७३ नंतर पहिल्यांदाच महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला

अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास[संपादन]

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड फेरी न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
प्रतिस्पर्धी संघ निकाल गट फेरी प्रतिस्पर्धी संघ निकाल
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क २३९ धावांनी विजय सामना १ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ७ गडी राखून विजय
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २५ धावांनी पराभव सामना २ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २५ धावांनी विजय
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड १६२ धावांनी विजय सामना ३ डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क ९ गडी राखून विजय
भारतचा ध्वज भारत ३ धावांनी विजय सामना ४ Flag of the Netherlands नेदरलँड्स १० गडी राखून विजय
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४३ धावांनी विजय सामना ५ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजय
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजय सामना ६ भारतचा ध्वज भारत ४२ धावांनी विजय
Flag of the Netherlands नेदरलँड्स १३३ धावांनी विजय सामना ७ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजय
गट फेरी द्वितीय स्थान
स्थान संघ खे वि गुण नि.धावगती
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २४ ३.२०२
खेळल्या गेलेल्या सामन्यांच्या गुणांच्या संदर्भात
गट फेरी गुणफलक गट फेरी प्रथम स्थान
स्थान संघ खे वि गुण नि.धावगती
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २८ ३.३८२
खेळल्या गेलेल्या सामन्यांच्या गुणांच्या संदर्भात

अंतिम सामना[संपादन]

१ ऑगस्ट १९९३
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१९५/५ (६० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१२८ (५५.१ षटके)
जॅन ब्रिटीन ४८ (११७)
साराह मॅकलॉक्लान २/२५ (१० षटके)
मैया लुईस २८ (८७)
जिलियन स्मिथ ३/२९ (१२ षटके)
इंग्लंड महिला ६७ धावांनी विजयी.
लॉर्ड्स, लंडन
पंच: जुडिथ वेस्ट (इं) आणि व्हॅलेरी गिबन्स (इं)
सामनावीर: जो चेम्बरलेन (इंग्लंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.