हाफिज सईद
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| हाफिज मुहम्मद सईद | |
|---|---|
| [[File: |
|
| जन्म | मार्च १०, १९५० सरगोधा, पाकिस्तान |
| राष्ट्रीयत्व | पाकिस्तानी |
| ख्याती | कुप्रसिद्ध दहशतवादी |
| धर्म | मुस्लीम |
हाफिज मुहम्मद सईद ( १० मार्च, इ.स. १९५० - हयात ) हा मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा प्रमुख सूत्रधार व प्रमुख आरोपी आहे. जमात-उद-दवा व लष्कर-ए-तैयबा या पाकिस्तानी अतिरेकी संघटनेचा तो संस्थापक प्रमुख आहे.[१][२] सईद याला पाकिस्तानातील सुप्रीम कोर्टाने सबळ पुराव्याअभावी सोडून दिले असले तरी त्याला कटकारस्थान व भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या आरोपात भारतीय ट्रायल कोर्टाने दोषी धरले आहे.[३]
इनाम [संपादन]
हाफिज सईद याला पकडणाऱ्या किंवा त्याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती देणाऱ्या व्यक्तीला अमेरिका सरकारने तब्बल १ कोटी अमेरिकी डॉलरचे इनाम १ एप्रिल २०१२ रोजी घोषित केले आहे.[४]