स्टार वॉर्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
स्टार वॉर्स ही जॉर्ज लुकास ह्यांनी लिहिलेली ६ चित्रपटांची शृंखला आहे. ह्यामध्ये एका काल्पनिक आंतराळात वावरणाऱ्या मनुष्य, यंत्रे व इतर जातीच्या प्राण्यांची कथा चित्रित केली आहे. स्टार वॉर्स ही जगातील तिसरी सर्वात यशस्वी चित्रपटशृंखला आहे.
स्टार वॉर्स चित्रपटांचे वैशिष्ठ्य असे आहे की हे सहा चित्रपट १ ते ६ ह्या क्रमाने प्रदर्शित न होता ४, ५, ६, १, २ व ३ ह्या क्रमाने बनवले व प्रदर्शित केले गेले. प्रदर्शन तारखेप्रमाणे स्टार वॉर्स चित्रपट खालील यादीत दिले आहेत.
| चित्रपट | प्रदर्शन तारीख | एकुण जागतिक उत्पन्न |
|---|---|---|
| स्टार वॉर्स भाग ४: अ न्यू होप | मे २५, १९७७ | $७७,५३,९८,००७ |
| स्टार वॉर्स भाग ५: द एम्पायर स्ट्राईक्स बॅक | मे २१, १९८० | $५३,८३,७५,०६७ |
| स्टार वॉर्स भाग ६: रिटर्न ऑफ द जेडाई | मे २५, १९८३ | $४७,५१,०६,१७७ |
| स्टार वॉर्स भाग १: द फँटम मेनेस | मे १९, १९९९ | $९२,४३,१७,५५८ |
| स्टार वॉर्स भाग २: अटॅक ऑफ द क्लोन्स | मे १६, २००२ | $६४,९३,९८,३२८ |
| स्टार वॉर्स भाग ३: रिव्हेन्ज ऑफ द सिथ | मे १९, २००५ | $८४,८९,९८,८१५ |