सोनके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

कोरेगांव तालुका, सातारा जिल्हा. महाराष्ट्र ४१५५२५

सोनके गाव हे सातारा जिल्ह्यातील वसना नदीच्या काठावर वसलेले एक गाव आहे.

नाव[संपादन]

सोनके म्हणजे "सोन्याचे" गाव अशी गावाची ख्याती आहे.

भूगोल[संपादन]

सोनके गाव हे वाठार रेल्वे स्टेशनपासून ८ किलोमीटरवर वायव्य दिशेस वाठार-वेळे या रस्त्यावर आहे. गावच्या पश्चिमेस वसना नदीचवणेश्वर चा डोंगर आहे. गावाची शेती चारी दिशांना आहे. सोनक्याच्या बाजूला पिंपोडे बु., वाघोली, चौधरवाडी, करंजोखोप, जगतापनगर, नांदवळभावेनगर हि गावे आहेत.

गावकरी[संपादन]

सोनक्याचे मूळ रहिवासी आसबे व धुमाळ असून, सध्या गावात शिंदे, भोईटे, बर्गे, जाधव, पवार, निंबाळकर्, कदम, चव्हाण, यादव, सुतार, गुरव, साठे, गंगावणे, शेख, इनामदार, सय्यद, आतार्, शिकलगार्, कांबळे, मोरे, वाठारकर, वेदपाठक, अचपळ, इथापे, चिंचकर, किरवे, नाईक, घोरपडे, जगताप, कोरडे, काकडे, वर्पे, अशा आडनावाची कुटंबेपण आहेत.

ग्राम दैवत[संपादन]

सोनके गावाचे श्री काळ भैरवनाथ हे ग्रामदैवत आहे. सोनके गावाचे रहिवासी भैरवनाथाला "नाथसाहेब" या नावाने संबोधतात. नाथसाहेबांचे गावात फार सुंदर असे मंदिर असून मंदिराचा परिसर अतिशय पाहण्यासारखा आहे. गावकरी नाथसाहेबांची जत्रा दरवर्षी अश्विन महिन्याच्या चौथ्या रविवारी साजरी करतात.

ग्रामव्यवस्था[संपादन]

गावाला स्वतःची ग्रामपंचायत आहे. गावाची स्वच्‍छता, पाणी व्यवस्था व गावाच्या घरपट्टी कराचा कारभार ग्रामपंचायत पाहते.

शिक्षण व्यवस्था[संपादन]

गावामध्ये इयत्ता दहावी पर्यंत शि़क्षणाची सोय आहे. गावात ३ बालवाडी वर्ग आहेत. प्राथमिक (पहिली ते सातवी) शिक्षण "जीवन शिक्षण विद्यामंदिर सोनके" या शाळेतून दिले जाते तर माध्यमिक (आठवी ते दहावी) भारत विद्यामंदिर वाघोली या हायस्कूलमधून दिले जाते. हायस्कूलच्या नवीन इमारतीचे बांधकाम साताऱ्याच्या आदर्श ग्रुप बिल्डर्स व डेव्हलपर्स यांनी स्वखर्चान करुन् दिले.

शेती व्यवस्था[संपादन]

शेती हा गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय आहे.

प्रसिद्ध व्यक्ती[संपादन]

कै.साहेबराव पिलाजी धुमाळ कै.विनायक गेनबा धुमाळ कै.बाबू बाळा धुमाळ कै.आनंदराव (आप्पा) नरसिंग धुमाळ कै.यशवंत पिराजी धुमाळ कै.सर्जेराव (बच्चु दादा) विष्णु धुमाळ कै. भगवान (आप्पा) काकासो धुमाळ कै. धुमाळ गुरूजी कै. कोंडिराम सुतार कै. नारयण सुतार कै. रावसाहेब खाशाबा धुमाळ

गणपत आपाजी गुरव दत्तात्रय सर्जेराव धुमाळ संभाजी नानासो धुमाळ

ठळक घटना[संपादन]

१९८३ - ८ वी ते १० वी हायस्कूला आरंभ. २०१० - हायस्कूलच्या नवीन इमारतीचे बांधकाम पुर्ण.