Jump to content

सायत्री बाड्डे (पक्षी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सायत्री बाड्डे
सायत्री बाड्डे

सायत्री बाड्डे (इंग्लिशछ:Ruff, Reeve; हिंदी:गरवाल, गेहवाला, बगबद; संस्कृत:जलरंक; गुजराती:टिलियो) हा एक पक्षी आहे.

आकाराने नर तित्तिराएवढा.मादी लाव्यापेक्षा मोठी.राखट तपकिरी जलचर पक्षी.वरील पिसारा खवल्या-खवल्यांसारखा ठळक.तुतवार पक्ष्यासारखी चोच.उडताना शेपटीच्या दोन्ही बाजूंना अंडाकृती डाग दिसतात.नर-मादी दिसायला सारखेच असले,तरी मादी बारक्या चणीची असते.काळा,पांढरा,जांभळा,तांबूस,बदामी अशा नाना रंगाच्या छटा उन्हाळ्यात त्याच्या पिसाऱ्यावर दिसू लागतात.मादी मात्र हिवाळ्यापेक्षा अधिक काळपट दिसू लागते.

वितरण

[संपादन]

भारत,पाकिस्तान,लंका व ब्रह्मप्रदेशात हिवाळी पाहुणे म्हणून युरोप व दक्षिण आशियातून येतात.उतर युरोप व पश्चिम सैबेरिया या भागात वीण.

निवासस्थाने

[संपादन]

दलदली व चिखलाणी.

संदर्भ

[संपादन]
  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली.