सर्च इंजिन ऑप्टीमाइझेशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सर्च इंजिनमधील सर्च रीझल्ट करताना वेबसाईटची किंवा वेब पेजची दृश्यता परिणामकारक करण्यासाठी सर्च इंजिन ऑप्टिमाइझेशन (एसईओ) केले जाते. सुरुवातीच्या काळात सर्च इंजिन वापरकर्त्यांकडून ज्या संकेतस्थळांना जास्तीत जास्त भेटी दिल्या जात होत्या ती संकेतस्थळे शोधयादीमध्ये झळकताना दिसत होत्या. एसईओ मुळे वेगवेगळया सर्चवर जसे चित्रांसाठी सर्च, स्थानिक बाबींसाठी सर्च, दूरचित्रवाणींसाठी सर्च, महाविदयालयीन / शालेय बाबींकरीता सर्च , उदयोगाशी संबंधित सर्चवर काम करणे शक्य झाले आहे.[१]

सर्च इंजिन कशा प्रकारे काम करते? लोक कशासाठी सर्च करतात ? प्रत्यक्षात सर्च इंजिनमध्ये कोणते प्रतिशब्द दिले जातात? प्रेक्षकाकडून कोणत्या सर्च इंजिनचा वापर केला जातो? या सर्व बाबी एसईओ मध्ये विचारात घेतल्या जातात. मजकूरामध्ये बदल, ठराविक कीवर्डशी संबंधित एचटीएमएल आणि सांकेतांकामध्ये बदल, सर्च इंजिनमधील क्रमांकित प्रणालीमधील अडथळे दूर करणे इ. बाबी वेबसाईट ऑप्टीमाइझेशनमध्ये समाविष्ट आहेत.

एसईओ याचा अर्थ एसईओ सेवा देणारे सर्च इंजिन ऑप्टिमाइझर असा सुद्धा होतो.

इतिहास[संपादन]

साधारणतः १९९० च्या मध्यामध्ये वेबमध्ये माहिर असलेल्यांनी आणि मजकूर उपलब्ध्‍ करून देणाऱ्यांनी सर्च इंजिनसाठी साईटस बनवायला सुरुवात केली. सुरुवातीस वेबमास्टर्स पान फिरत राहण्यासाठी वेगवेगळया इंजिनना स्पायडर त्या पानाचा पत्ता किंवा यूआरएल पाठवायचे, त्यातून दुस-या पानांमधील आवश्यक ती माहिती शोधून काढली जायची आणि नंतर मिळालेली माहिती त्या पानावर क्रमाने मिळायची.[२] परंतु हळूहळू सुधारणा होत होत ही पद्धत मागे पडली आणि एसईओच्या सहाय्याने साईटसचा दर्जा सुधारायला लागला. औदयोगिक विश्लेषक डॅनी सुलीवन यांच्या म्हणण्याप्रमाणे सर्च इंजिन ऑप्टीमाइझेशन साधारणत: 1997 मध्ये प्रथम वापरले गेले.[३] जॉन ऑडेटी आणि त्याची मल्टीमेडीया मार्केटिंग समूहाने ऑगस्ट 1997 पासून एमएमजी साईटसमधून त्याचा प्रत्यक्ष वापर चालू केला.[४] 1998 मध्ये पेज आणि ब्रिन यांनी गूगल या साईटचा शोध लावला आणि गूगलच्या साध्या सोप्या रूपामुळे आणि हाताळणीमुळे त्याचा वापर सर्वत्र वाढत आहे.(5)

सर्च इंजिनशी नाते[संपादन]

१९९७ पासून सर्च इंजिन तयार करणारे वेबमास्टर्स यांचे सर्च इंजिनशी खूप जवळचे नाते असून त्यांच्यामुळेच दर्जा दिवसेंदिवस सुधारत आहे.

पद्धती[संपादन]

अनुक्रमणित अभिलेख[संपादन]

गूगल, बिंग, आणि याहू ही स्वयंचलित अग्रगण्य सर्च इंजिन्स आहेत. याहू हे सर्च इंजिन प्रति टिचकी दर किंवा शुल्क आकारणी अदा केल्यानंतर सेवा देते.[५] अशा प्रकारच्या आज्ञावल्यांमुळे माहिती मिळणे सहज शक्य होते परंतु अशा सर्च रिझल्ट मधून मिळणा-या माहितीच्या दर्जाबददल खात्री देता येत नाही.[६]

हाताळण्यास मज्जाव[संपादन]

सर्च अनुक्रमणिकेमध्ये आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी वेबमास्टर्स यंत्रमानवाच्या सहाय्याने ठराविक फाईल्स किंवा मार्गदर्शिका स्पाईडर्सना सूचना देउु शकतात. यंत्रमानवांना मेटा टॅग ही सुविधा वापरून एखादे पान सर्च इंजिनच्या माहितीजालातून वगळता येणे सहज शक्य आहे.[७]

वाढते महत्त्व[संपादन]

सर्च रिझल्ट मधील विविध पद्धतीमुळे वेबपेजचे महत्त्व वाढत आहे. जास्तीत जास्त लिंक उपलब्ध व्हाव्यात यासाठी तयार केलेल्या एकसारख्या वेबसाईटमधील पानांच्या क्रोस लिंकिंगमुळे दृश्यतेवर परिणाम होवून त्यात सुधारणा होत असते.[८] सर्च इंजिन पुन्हा पुन्हा हाताळण्यामुळे अद्ययावत मजकूर मिळून त्या ठराविक साइटची लोकप्रियता वाढत जाते.

व्हाईट विरुद्ध ब्लॅक हॅट तंत्र[संपादन]

एसईओ हे तंत्रज्ञान मुख्यत्वेकरून दोन प्रवर्गामध्ये विभागले जाते. सर्च इंजिन एखादया तंत्राला चांगल्या प्रतीचे म्हणून शिफारस करते आणि दुसरे एखादे तंत्र मान्य न करता नाकारते. औदयोगिक प्रवक्ते या पद्धतीला व्हाइट हॅट एसईओ किंवा ब्लॅक हॅट एसईओ असे म्हणतात.[९] व्हाईट हॅट तंत्रामुळे दीर्घ काळापर्यंत परीणाम टिकून रहातात तर ब्लॅक हॅट तंत्रामुळे एखादी साईट तात्पुरती किंवा कायमची बंद केली जाते.[१०]

बाजारपेठेतील कौशल्य[संपादन]

कोणत्याही इतर जाहिरातींपेक्षा इंटरनेटच्यामाध्यमातून विक्रीकला कौशल्याने करण्यासाठी हे तंत्र प्रभावी पणे वापरता येते.[११]

आंतरराष्ट्रीय बाजारपेठ[संपादन]

गूगल सारख्या अग्रगण्य सर्च इंजिनमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ सर्वांसाठी खूली झालेली आहे.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ बील, जोरान आणि जीप, बेला आणि विल्डे, एरिक. "'ॲकॅडमिक सर्च इंजिन ऑप्टीमाइझेशन : गूगलच्या हुशार लोकांसाठी माहितीचा खजिना'" (PDF) (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ ब्रायन पिंकरटन. "'लोकांना हव्या असलेल्या गोष्टीचा शोध'" (PDF) (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ डॅनी सूलीवन. "'सर्च इंजिन ऑप्टीमाईझेशन चा शोध कोणी लावला ?'" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "'इंटरनेटव्दारे एसईओ चा शोध कोणी लावला त्याचा अभिलेख तयार'" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ थॉमसन, बील. "(डिसेंबर १९ , २००३) 'तुमच्यासाठी गूगल चांगले आहे काय ?'" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ "'सर्च क्राऊलचा शोध : गूगल, याहू आणि इतर'. मार्च १२, २००७" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ "वेबमास्टर साधने वापरकर्ते हिताचे रक्षण करण्यासाठी गूगल द्वारे उपयुक्त कृत्य" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2013-11-04. 2013-11-30 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  8. ^ "'सर्च सादर'.[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (इंग्लिश भाषेत). URL–wikilink conflict (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  9. ^ "'अतिशय महत्त्वाचे एसईओ स्टॅटेजी'" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  10. ^ ॲन्डयू गॉडमन. "'सर्च इंजिन शेाडाउुन : एसईएस कडे ब्लॅक हॅटस विरुद्ध व्हाईट हॅट'" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  11. ^ जील व्हॅलेन. "(नोव्हेंबर १६, २००४) 'ब्लॅक हॅट/व्हाईट हॅट सर्च इंजिन ऑप्टीमाइझेश्न'" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)