सदस्य:V.narsikar/धूळपाटी/ज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@आदरणीय आणि :

टिप:खालील मजकूर फक्त सदस्य ज यांचेसाठीच वैयक्तिकरित्या असून इतरांनी तो वाचूही नये व त्यात अनावश्यक फेरफार करू नये. तो सदस्य ज शिवाय इतर कोणासही लागू नाही. यातून गैरसमज करू नये व गैर अर्थ काढू नये.त्यावर कृपया प्रतिसादही देऊ नये.धन्यवाद. (एक विनंती‌-खालील मजकूरात आपले दृष्टीने अनेक चूका असतील त्या कृपया समजून घ्याव्यात.) बरेच दिवस झालेत, मनात सुरू असणारी खदखद आज बाहेर पडत आहे. आज शेवटी ठरविलेच कि, आपणास साद द्यायचीच. आपणाबद्दल मला असलेली माहिती खाली उघड करीत आहे. ते संकेतात बसत नाही पण ते येथे नमूद करावेसे वाटले.त्याने आपल्या सदस्य-गोपनीयतेत काहीही फरक पडणार नाही असे वाटत आहे म्हणून. मला आपले बद्दल विकिमार्फतच कळलेल्या गोष्टी अशा आहेत, त्यातील काही बहुदा माझे गैरसमजही असू शकतात:

  • आपण भोपाळ येथे राहता.
  • आपण अनेक दिवस गुजरातमध्ये काम केलेआहे व तेथील परिसराशी आपण अवगत आहात.
  • आपलेपाशी खूप जूना लॅपटॉप आहे.त्यात अनेक सोयी नाहीत व त्यावर आपण कसेबसे काम करीत असता.त्याबद्दल आपणास खेद वाटत राहतो.तरीही मराठीवर असलेल्या प्रेमापोटी आपण येथे योगदान करीत असता.
  • आपणास मराठी भाषेविषयी अत्यंत प्रेम आहे व बाष्कळ लेखन आपणास पसंत नाही.आपण मराठी व हिंदी भाषेच्या व्याकरणात व शुद्धलेखनात पारंगत आहात व माझे मते, सध्या त्यामध्ये विकिवर आपणावर मात करू शकेल असा कोणीही नाही.
  • आपलेपाशी कोणताही विपत्रपत्ता उपलब्ध नाही. आपला संपर्काचा नंबरही कोणापाशी नाही. तो कोणासही उपलब्ध होऊ नये असे आपणास वाटते.प्रसिद्धीपरांमुखता(< टंकनदोष) आपणास आवडते.
  • तरीही, मराठी विकिपीडियास आपण एक कुटुंब मानता. त्यात आपण जसे जमेल तसे योगदान करीत असता व ते एकसंध रहावे असे आपणास वाटत राहते.अनेक नवीन सदस्यांना मराठी लेखनाचे पुरेसे ज्ञान नसते, त्यामुळे त्यांचे लेखनामध्ये होणाऱ्या चूका या लगेचच जगभर होतात म्हणून त्या लगोलग सुधरविण्याचा आपण भरसक प्रयत्न करता.
  • आपणास तांत्रिक बाबतीत पुरेसे ज्ञान नाही.
  • आपण सर्वांशी अत्यंत आदरानेच वागता. आजतागायत आपण कोणाचा अनादर केलेला नाही व अपशब्द लेखन केलेले नाही.
  • भारतीय, विशेषत:महाराष्ट्रीयन संस्कृतीबद्दल आपणास बरीच जाण आहे.अशा व तत्सम लेखात आपण केलेले बदल यामागचा प्रामाणिक उद्देश कोणाचे दोष दाखविणे असा नसून योग्य बाब प्रगट व्हावी असा असतो.
  • मराठी विकिपीडियावर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन दृग्गोचर व्हावे, अनेक विसरत चाललेल्या गोष्टी ह्या येथे नमूद व्हाव्यात,जेणेकरून पुढील पिढीस त्या कळाव्यात असा आपला येथील लेखनात उद्देश दडलेला असतो.आपणास साहित्यात व आयुर्वेदात रस आहे.
  • मराठी भाषा आपले योग्य साज-अलंकार लेऊन येथे निर्दोषपणे प्रगट व्हावी, असेही आपणास सतत वाटत राहते.त्यादृष्टीने आपण प्रयत्न करीत राहता.
  • येथे लेखन करण्यापोटी आपण कोणत्याही आर्थिक वा तत्सम मदतीची अपेक्षा करीत नाही.ऊलट पदरमोड करून लेखन करता.

वरील बाबींचे लेखन, याचा उद्देश आपले गुण-दोष दाखविणे अथवा आपली भलावण करणे असा नसून आपलेबद्दल माझा झालेला प्रामाणिक समज प्रगट करणे असाच आहे. त्यातून कृपया काही गैर-अर्थ काढू नये ही नम्र विनंती.

मागील काही दिवसात,आपले लेखनाबद्दल बरेच रान उठविल्या जात आहे, आपण प्रताधिकार करीत आहात व आपण स्त्री-सदस्यांनी संपादित केलेले लेख व त्यायोगे त्यांचे स्वातंत्र्यावर आघात करीत आहात वगैरे वगैरे.

याबाबत, आपण माझेपेक्षा वयस्कर असूनही, लहान तोंडी मोठा घास घेऊन, मी आपणास एक अनाहूत सल्ला देऊ इच्छितो.आपल्या येथील लेखनातून निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे. आपले येथील अवतारकार्य कृपया समाप्त करावे. जगात अनेक संकेतस्थळे अशी आहेत कि तेथे आपण आपले योगदान करू शकाल.तेथे आपणास बराच वाव आहे.आपण विकिपासून दूर गेलात तर त्याची सल अर्थातच माझ्या मनात कायम राहील ही गोष्ट अलहिदा.

लवकरच, मीही येथून निवृत्ती घेण्याचा विचार करीत आहे.संपूर्ण जगाची आपण काळजी घेऊ शकत नाही ही माझी पक्की धारणा आहे. भारताचे अनेक माजी पंतप्रधान निवर्तल्यावर भारताचे कसे होणार ही काळजी अनेकांना लागून राहिली होती. पण त्याने काहीच फरक पडला नाही. भारत तरला आहे व त्यासारखाच विकिही तरेल असे मला नेहमी वाटत राहते.कोणाशिवाय कोणाचेही अडत नाही हेही तितकेच खरे आहे.

येथे मतभेद असावेत पण मनभेद असू नयेत या मताचा मीही आहे.आपणावर करण्यात आलेली तात्पुरत्या निलंबनाची कृती ही मला अजिबात भावली नाही पण ती अनिवार्य (निवारण न करता येण्याजोगी) होती याची आपणास जाण असेलच. असो. वाटले ते प्रगट केले.

(भू.चू.ले.दे.)

आपला