शेख हसीना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शेख हसीना वाजेद या पानावरून पुनर्निर्देशित)
शेख हसीना
शेख हसीना

बांगलादेशच्या पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
६ जानेवारी २००९
मागील इयाजुद्दीन अहमद
कार्यकाळ
२३ जून १९९६ – १५ जुलै २००१
मागील खालेदा झिया
पुढील इयाजुद्दीन अहमद

विद्यमान
पदग्रहण
१७ मे १९८१

जन्म २८ सप्टेंबर, १९४९ (1949-09-28) (वय: ६५)
पूर्व बंगाल, पाकिस्तान (आजचा बांगलादेश)
वडील शेख मुजिबुर रहमान
धर्म मुस्लिम

शेख हसीना (बांग्ला: শেখ হাসিনা; जन्म: २८ सप्टेंबर १९४९) ह्या दक्षिण आशियामधील बांगलादेशच्या विद्यमान पंतप्रधान आहेत. ह्यापूर्वी १९९६ ते २००१ दरम्यान त्या ह्या पदावर होत्या. शेख हसीना बांगलादेशाचे स्वातंत्र्यसैनिक व पहिले पंतप्रधान शेख मुजिबुर रहमान ह्यांची मुलगी असून त्या १९८१ सालापासून बांगलादेश अवामी लीग ह्या राजकीय पक्षाच्या पक्षाध्यक्ष आहेत.

गेली चार दशके देशाच्या राजकारणामध्ये कार्यरत असलेल्या हसीना ह्यांच्यावर अनेकदा भ्रष्ट्राचाराचे आरोप झाले आहेत. बेगम खालेदा झिया ह्या शेख हसीनांच्या प्रतिस्पर्धी असून त्या दोन नेत्यांनी गेली २० वर्षे बांगलादेशाच्या राजकारणावर आपली पकड ठेवली आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत