Jump to content

शांग्री–ला हॉटेल, सिंगापूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शांग्री-ला हॉटेल सिंगापूरमधील पंचतारांकित हॉटेल आहे. [१] हे आर्चर्ड रोड, सिंगापूर मधील ऑरेंज ग्रोव्ह रोडवर आहे.

23 एप्रिल 1971 रोजी याचे उद्घाटन झाले. हे निशांनधारी हॉटेल शाग्री-ला हॉटेल आणि रिसॉर्टचे पहिले हॉटेल आहे. [२] या हॉटेल मध्ये 747 अतिथि खोल्या आहेत आणि त्या टावर विंग, गार्डन विंग आणि ह्याली विंग या ठिकाणी विस्तारलेल्या आहेत. 127 खोल्यां आणि 55 आरामदायक किफायतशीर दराचे सुट्स उपलब्ध आहेत. 15 एकर जमीनीवरील बगीचाचा लाइट मधील देखावा आणि हॉटेलच्या व्हरांड्याच्या काचेच्या तावदानातून पाहता येणारा तसेच भोजन कक्षातून नजरेला भिडविणारा देखावा डोळ्याचे पारणे फेडतो. हा बगीचा म्हणजे सिंगापूरची “वनस्पति बाग” (बोटनिकल गार्डन) म्हणून ही उल्लेखिली जाते. [३] याने अनेत अवॉर्ड मिळविलेले आहेत त्यात ‘TripAdvisor”s Traveller”s Choice 2012: Top 25 hotels in सिंगापूर” याचा समावेश आहे. [४] हे हॉटेल म्हणजे या देशयाचे संरक्षण मंत्र्याचे सभा भरविणारे, सर्व मंत्रालयाचे मुख्य आणि 28 आशिया पॅसिफिक देशयांचे लक्षर दलाचे मुख्य यांचे सभेचे व्यवस्थापन पहाणारे सन 2002 पासून यजमान आहे. संवाद घडविणारे सांग्री-ला असी त्याची ओळख आहे.

टावर विंग[संपादन]

याचे उद्घाटन 1971 मध्ये झाले. ही विंग म्हणजे या हॉटेलचा मुख्य भाग आहे. यात अत्त्युत्तम खोल्या, मुख्याधिकारी खोल्या, होरीझोन क्लब रूम्स, होरीझोन प्रमुख विश्राम ग्रह, आहे. खोल्या आणि विश्राम ग्रहा व्यतिरिक्त या विंग मध्ये बाहेर जाण्याच्या मार्गावर भोजन व्यवस्था ही आहे. टावर विंग मध्ये व्यवसाय केंद्र, गिफ्ट शॉप, फूलविक्रेता, केस कर्तन, सौंदर्य प्रसाधन,हेयर ड्रेसर,टेलर, प्रवाशी डेस्क, या सुविधा आहेत.[५]

गार्डन विंग[संपादन]

सन 1978 मध्ये याचे उद्घाटन झाले. हे या शहराचे अतिउष्ण काळातील विश्रांति स्थान आहे.याच्यात अत्त्युत्तम खोल्या, कोपऱ्यावरील मुख्य खोल्या, आणि एक व दोन बेड रूम विश्राम ग्रह आहेत. याशिवाय इथूनच 15 एकर जमीनीवरील वेगवेगळ्या प्रकारची 110 रोपे, फुलांचे ताटवे, झाडे, त्यातच मानव निर्मित लहानसा धबधबा, कॅफे, की जेथे अथीती पोहण्याच्या तलावा शेजारीच भोजन घेऊ शकतात हे दृश्य मनाला रिझवून जाते. सन 2011 मध्ये ही विंग नुतांनीकरणासाठी बंद केली आणि S$66 मिल्लियन खर्च करून 8 महिन्यांनंतर 31 मे 2012 रोजी चालू केली. [६] पूर्वीच्या व्यवस्थेत आता डिलक्स रुम आणि एक बेड रुम सूट तसेच प्रमुख बाल्कनी सूटची भर पडली. आवश्यकते प्रमाणे नवीन भोजन व्यवस्था ही केली. भोजन व्यवस्थेत भूमध्य सागरातील अनुभवाची प्रारणा विचारात घेऊन चक्रिय व्यवस्था आमलात आणली आणि स्वायपाक ग्रहात सकस आहार सुविधा 19 जुलै 2012 रोजी सुरू झाली.

स्पा[संपादन]

सेवा ही 7-12-2012 रोजी सुरू झाली. तेथे विविध बाबींची व्यवस्था आहे त्याला स्थानिक विचारांचा वारसा मिळाला आहे.

व्हॅली विंग[संपादन]

ही विंग संन 1985 मध्ये सुरू झाले. या हॉटेलची ही विंग विश्रांतीसाठी येणाऱ्या प्रवाश्याश्यांना हॉटेल आणि स्वयंपाकी पुरविणारी स्वतंत्र विंग आहे. येथे खोल्या अत्त्युत्तम खोल्या, वन बेड रम सुट्स, डिलक्स सुट्स, दोन बेडरूम सुटस,आणि शांग्री–ला अध्यक्षीय विश्राम ग्रह उपलब्ध आहेत. या विंगला स्वतंत्र खाजगी प्रवेश मार्ग,,वाहन मार्ग,स्वागत कक्ष,समारंभ हॉल, खाजगी अल्पोपहार रम, टेरेस ग्रह, अठीती साथी उपलब्ध आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2014-04-30. 2015-10-01 रोजी पाहिले.
  2. ^ Shangri-La Hotel, Singapore - Fast Facts
  3. ^ "शांग्री–ला हॉटेल , सिंगापूर रिव्हयू" (इंग्लिश भाषेत). ०१-१०-१५ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ http://www.tripadvisor.com.my/TravelersChoice-Hotels-cTop25-g294262
  5. ^ "शांग्री–ला हॉटेल , सिंगापूर अत्त्युत्तम खोल्या" (इंग्लिश भाषेत). ०१-१०-१५ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ "शांग्री–ला हॉटेल , सिंगापूर गार्डन विंग" (इंग्लिश भाषेत). ३०-०९-१५ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)