वेस्टमिन्स्टर राजवाडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
थेम्स नदीकाठावरील वेस्टमिन्स्टर राजवाडा

वेस्टमिन्स्टर राजवाडा (इंग्लिश: Westminster Palace) ही ब्रिटिश सरकारच्या संसदेची इमारत आहे. ग्रेटर लंडन महानगरामधील वेस्टमिन्स्टर बरोमध्ये थेम्स नदीच्या उत्तर काठावर स्थित असलेल्या वेस्टमिन्स्टर राजवाड्यात ब्रिटिश संसदेच्या हाउस ऑफ लॉर्ड्सहाउस ऑफ कॉमन्स ह्या दोन्ही गृहांचे कामकाज चालते.

मध्य युगात बांधला गेलेला वेस्टमिन्स्टर राजवाडा व तेथील बिग बेन हा टॉवर ह्या ब्रिटिश सरकारच्या सर्वात ओळखल्या जाणाऱ्या खुणा मानल्या जातात व लंडन शहरामधील ऐतिहासिक वास्तू आहेत. १९८७ साली वेस्टमिन्स्टर राजवाडा, वेस्टमिन्स्टर अ‍ॅबीसेंट मार्गारेट्स ह्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत समावेश करण्यात आला.


बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: