वेदोक्त प्रकरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजर्षी शाहू महाराज

वेदोक्त प्रकरण ही राजर्षी शाहू महाराज यांच्याशी संबंधित एक ऐतिहासिक घटना आहे. हे प्रकरण इ.स. १८९९ साली कोल्हापुरात घडले होते.[१] राजघराण्यातील ब्राह्मण पुरोहितांनी वैदिक स्तोत्रानुसार ब्राह्मणेतरांचे संस्कार करण्यास नकार दिल्याने शाहूंनी आर्य समाज आणि सत्यशोधक समाजाला पाठिंबा देण्याबरोबरच मराठा समाजाच्या हक्कांसाठी प्रचार केला. त्यांनी पुजाऱ्यांना हटवून क्षात्रजगद्गुरू (क्षत्रियांचे विश्व गुरू) ही पदवी देऊन एका तरुण मराठाची ब्राह्मणेतरांचे धर्मगुरू म्हणून नियुक्ती करण्याचे धाडसी पाऊल उचलले. याला वेदोक्त वाद म्हणून ओळखले जाते. ते लवकरच ब्राह्मणेतर चळवळीचे नेते बनले आणि मराठ्यांना त्यांच्या झेंड्याखाली एकत्र केले. [२] [३]

घटना[संपादन]

इ.स. १८९९ मध्ये कोल्हापुरात ही घटना घडली. शाहू महाराज हे कार्तिक महिन्यात पंचगंगा नदीवर स्नानासाठी जात असत. तेव्हा त्यांच्यासोबत बंधू बापूसाहेब महाराज, मेहुणे मामासाहेब खानविलकर आणि स्नानाच्या वेळी मंत्र म्हणणारे नारायण भटजी असत. एकेदिवशी महाराजांसोबत त्यांचे स्नेही आणि पंडित राजारामशास्त्री भागवत होते. महाराजांचे स्नान सुरू असताना भटजी म्हणत असलेले मंत्र वेदोक्त नसून पुराणोक्त असल्याचे त्यांनी महाराजांना लक्षात आणून दिले. याबाबत भटजींना विचारता उत्तरादाखल शूद्रांना पुराणोक्त मंत्रच सांगावे लागतात, असे भटजी म्हणाले.

या उत्तराने शाहू महाराज हे अधिक विचारशील आणि अंतर्मूख झाले. पुढे ते मोठ्या सामाजिक चळवळीत उतरले. जर राजालाच दर्जा मिळत नसेल तर सामान्य लोकांवर किती अन्याय होत असेल याची कल्पना त्यांना आली.

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "वेदोक्त-पुराणोक्तः शाहू महाराजांच्या काळात घडलेले वेदोक्त प्रकरण काय होते?". BBC News मराठी. 2023-04-02. 2023-05-02 रोजी पाहिले.
  2. ^ "Pune's endless identity wars". Indian Express. 1 August 2015 रोजी पाहिले.
  3. ^ Rajarshi Shahu Chhatrapati Papers: 1900–1905 A.D.: Vedokta controversy. Shahu Research Institute, 1985 – Kolhapur (Princely State). 1985.