वूमन हिरोज अँड दलित ॲसर्शन इन नॉर्थ इंडिया (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कल्चरल सबओर्डीनेशन एंड दलित चैलेंज या नावाने प्रकाशित होणाऱ्या शृखलेमधला वूमन हिरोज एंड दलित असरशन हा सेज प्रकाशनाचा पाचवा भाग आहे. हे पुस्तक सेज प्रकाशनाचे असून सामाजिक इतिहासकार आणि मानववंशशास्त्रज्ञ बद्री नारायण[१] यांनी लिहिले आहे.

मुख्य विषय आणि पुस्तकाचे स्थान[संपादन]

वूमन हिरोज एंड दलित असरशन यामधुन दलितांची सांस्कृतिक अभिव्यक्ती आवाज (आग्रही मते) व त्यांचे मिथके ,प्रख्यात व्यक्ती ,स्थानिक इतिहास आणि नेत्या या सर्वांमुळे दलित कसे उद्युक्त होतात यावर भाष्य केले आहे. (मायथों- हिस्टोरीकल) मिथाकांच्या ऐतिहासिक दृष्टीकोनातून दलित नेत्या ,प्रख्यात व्यक्ती यांची माहिती संकलित करून व चिकित्सा करून बद्री नारायण हे दाखवतात कि दलित समुदायाने कसा त्यांच्या आत्मसन्मानाचा आणि स्व-ओळखीचा इतिहास तयार केला. बद्रीनारायण यांचे काम उत्तर प्रदेशात असून विशेषतः ते बहुजन समाज पार्टी[२]च्या राजकीय नेत्या मायावती[३] यांच्या स्थिर उदया संदर्भात आहे .

मुख्य मांडणी[संपादन]

व्यक्तीच्या ओळखी वर (तिच्या जात,धर्मावर ) आणि दलितांची संस्कृती यामधील गुंतागुंतीचे नाते ते उलगडून दाखवतात. बहुजन समाज पार्टीच्या बाबतीत जात ही विचारधारा ठरली व नंतर राजकीय सत्ता मिळविण्याचे साधन बनली. दलित कल्पनेमधून १८५७ च्या शिपायांच्या बंडाची पुनर्मांडणी कशी होते हा वेगळा पैलू या पुस्तकात दिसतो. या कथांमधून राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये असलेल्या शोषितांची भूमिका ठळक होते आणि राज्याने नेमून दिलेले हक्क यांची आत्ता कशी गरज आहे या मागची कारणे समजतात. भेदभाव करण्यांत येणाऱ्या गोष्टींपासून संरक्षण व राज्याच्या विकासाच्या अजेंड्यामध्ये याचा समावेश करणे गरजेचे आहे. मायावती यांचा राजकीय उदय आणि ज्या पद्धतीने बसपा ने झलाकारीबाईला महिला नेती म्हणून स्वीकारल्या याचा संबंध नारायण जोडतात. हे नायक दलितांची ओळख सांगणारी प्रतीके ठरली आणि छपाई माध्यमांनी याचा उत्प्रेरक म्हणून उपयोग करून घेतला. छपाई माध्यमाने दलित समूहाच्या पर्यायी इतिहासाला कायदेशीर मान्यता दिली.

आशय[संपादन]

पुस्तकाच्या प्रस्तावनेत महत्त्वाची मांडणी आणि सारांशरूपाने निष्कर्षाची रूपरेषा आहे. सातव्या प्रकरणामध्ये स्थानिक नेते (विशेषतः महिला नेत्या) आणि प्रख्यात (व्यक्ती) यांच्या मधून जी सांस्कृतिक व राजकीय प्रक्रिया आकारात आली . त्या प्रक्रियेचा वेध घेतला आहे . संपूर्ण पुस्तकात इतिहास व विख्यात व्यक्ती तसेच त्यांच्या मधला गुंतागुंतीचा संबंध आणि त्या भागातल्या दलिताच्या जीवनावर भूतकाळाचा आताच्या जीवनावर झालेला परिणाम याची चिकित्सा आहे. प्रकरण १ मध्ये दलित समुदायातून उदयाला आलेल्या कथा आहेत . त्या कथांमधुन जी भाषा वापरली गेली आहे. त्यामधुन कशा प्रकारे आत्मसन्मान व ओळख वृद्धिंगत होते ते समजते . ही भाषा विद्रोही असून ती समजण्यास सोपी जावी म्हणुन स्थानिक मिथक आणि प्रख्यात व्यक्तींची उदाहरणे यांनी सजलेली आहे. प्रकरण २ मध्ये दलित कल्पनेमधुन उदयाला आलेल्या पर्यायी इतिहास विस्तारण्याच्या आणि धारदार करण्याच्या छपाई माध्यमांच्या भूमिकेचे परिक्षण आहे. प्रकरण ३ मध्ये दृश्य स्वरूपातल्या नायकांच्या प्रतिमा उदयाला कशा आल्या आणि नवीन घटक त्या भागातील लोकांच्या संस्कृतीत नव्याने कसे आले याचे विश्लेषण आहे. प्रकरण ४. मध्ये राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेत दलितांचे योगदाना देणाऱ्या १८५७ च्या दलितांच्या आठवणी आहेत आणि ही अशी प्रक्रिया आहे जिचा इतिहास याचा सबंध लक्षात घेतो आणि दलितांच्या भविष्याला आकार देण्यासाठी याचा उपयोग केला गेला.. प्रकरण ५ आणि ६ मध्ये झलकारीबाई ज्याकी कोरी जातीतील असून राणी लक्ष्मी बाईंच्या मोलकरीण होत्या तसेच उदादेवी ज्याकी पासी मिथकांमधुन आलेले ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व आहे. दोन्ही व्यक्तिमत्त्व दलितांची प्रतीके असून त्यांना श्रेय देताना त्यांच्यामध्ये बरेच पुरुषी गुण चिटकवले आहेत. यांच्या कथा कशा निर्माण होतात आणि त्यांची १८५७ मधील त्यांची भूमिका कशी राजकीय आणि सांस्कृतिक रीत्या वापरली आहे याचे नारायणन समीक्षण करतात. प्रकरण ७ मध्ये दरबार आणि राणी यांच्याशी संबधित असलेल्या झलकारीबाई आणि उदादेवी यांच्यापेक्षा महावीरादेवी हे कशी वेगळी लक्षात ठेवली जाते याचे परीक्षण आहे.या प्रकरणात हे दिसून येते कि कसे दलित लेखकांनी दलित नेतीचे वर्णन करताना पुरुषी रजत्व आणि वीरत्व हे गुण वापरलेले आहेत आणि असेच गुण मायावतीना चीटकलवलेले आहेत. ते लोकमानसात असलेल्या इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेशी मायावतीची तुलना करतात.हे लक्षणीय आहे कि इंदिरा गांधी यांना देवी म्हणून चित्रित केले जाते तर शतकानुशतकांपासून दलितांची मुक्ती करणारी मायावती यांना “लोहाची विरांगणा” म्हणून चित्रित केले जाते.

सन्दर्भ सुची[संपादन]

  1. ^ http://www.jnu.ac.in/FacultyStaff/ShowProfile.asp?SendUserName=badrinarayan
  2. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2019-09-28. 2016-04-28 रोजी पाहिले.
  3. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2013-08-14. 2016-04-28 रोजी पाहिले.