"डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, लेह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट स्मारक
| नाव = डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, लेह
| मुळ_नाव = Statue of Dr. B. R. Ambedkar
| चित्र = [[File:Statue of Dr. Babasaheb Ambedkar at the Mahabodhi International Meditation Centre, in Leh, Ladakh.jpg|Statue of Dr. Babasaheb Ambedkar at the Mahabodhi International Meditation Centre]]
| मथळा = डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, लेह
| स्थान = लेह, लडाख, भारत
| रचनाकार =
| प्रकार =
| सामर्गी =
| लांबी =
| रुंदी =
| उंची = साडेसात फूट
| सुरुवात =
| समाप्ती = २०१६
| समर्पित =
| खुले = २४ जुलै २०१६
| पुनर्बांधणी =
| नष्ट =
| समर्पित = डॉ. बाबासाहेब आंबेडकर
| नकाशा_नाव =
| नकाशा_मजकूर =
| नकाशा_रुंदी =
| नकाशा_relief =
| गुणक =
| संकेतस्थळ =
| अधिक =
}}
[[File:Statue of Dr. Babasaheb Ambedkar at the Mahabodhi International Meditation Centre, in Leh, Ladakh.jpg|thumb|डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, लेह-लडाख]]
[[File:Statue of Dr. Babasaheb Ambedkar at the Mahabodhi International Meditation Centre, in Leh, Ladakh.jpg|thumb|डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, लेह-लडाख]]



२२:२४, २३ सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, लेह
स्थान लेह, लडाख, भारत
उंची साडेसात फूट
समाप्तीची तारीख २०१६
खुलण्याची तारीख २४ जुलै २०१६
यांना समर्पित डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, लेह-लडाख

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा हा जम्मू आणि काश्मिरच्या लडाख प्रदेशातील लेह येथे स्थित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा भारतातील सर्वाधिक उंच स्थानी असलेला पुतळा समजला जातो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २४ जुलै २०१६ रोजी या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. हा पुतळा साडेसात फूट उंचीचा असून नागपूरातून आणण्यात आला आहे. देशी-विदेशी लोकांना डॉ. आंबेडकरांच्या कार्यांची आणि विचारांची माहिती व प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा पुतळा बसवण्यात आला आहे. २१ ऑगस्ट २०१७ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या पुतळ्याला भेट दिलेली आहे.[१][२]

इतिहास

प्राचीन काळापासून बौद्धकालीन परिसर म्हणून लेह-लडाख प्रसिद्ध आहे. येथे पहिल्यांदाच २०१६ च्या २३ ते २५ जुलैदरम्यान "डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय परिषद" आयोजित करण्यात आली होती. आणि आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण २४ जुलै २०१६ रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी तेथे "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सेंटर" स्थापित केले व शिलान्यासही फडणवीस यांच्या हस्ते झाला. हा पुतळा नागपुरात तयार करण्यात आला होता. सनदी अधिकारी असलेले हर्षदीप कांबळे व त्यांच्या पत्नी रोंचाना व्हनिच यांनी हा पुतळा उभारणीसाठी आर्थिक मदत दिली होती. महाबोधी इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरतर्फे आंबेडकरांचा हा पुतळा उभारण्यात आला. पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, थायलंडचे भारतातील राजदूत चलित मनित्याकूल, भंते संघसेना महाथेरा, जैन धर्मगुरु लोकेश मुनी यांची मुख्य उपस्थिती होती. या प्रसंगी लडाखचे भंते संघसेना यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे "आधुनिक भारताचे निर्माते" असल्याचे मत मांडले. हा पुतळा साडेसात फूट उंचीचा आहे. पुतळ्याचे प्रतिकात्मक दान भंते संघसेना यांना करण्यात आले. लडाखमध्ये भारतीय आणि विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. त्यांना बाबासाहेबांच्या कार्याची आणि विचारांची प्रेरणा मिळावी, हा उद्देश पुतळा उभारण्यामागे होता. हिमालयीन पर्वतीय भागात उभारण्यात आलेला बाबासाहेबांचा हा पहिलाच पुतळा होय.[३][४]

संदर्भ

  1. ^ 24taas.com (इंग्रजी भाषेत) https://zeenews.india.com/marathi/news/india/cm-fadnavis-unveiled-the-statue-of-dr-babasaheb-ambedkar-in-leh/322338. 2019-02-06 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ The Indian Express (इंग्रजी भाषेत) https://indianexpress.com/article/india/india-news-india/devendra-fadnavis-unveils-ambedkar-statue-at-foothills-of-himalaya-2933925/. 2019-02-06 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ www.lokmat.com http://www.lokmat.com/nagpur/ambedkars-statue-ladakh/. 2019-02-06 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ www.mahanews.gov.in https://www.mahanews.gov.in/Home/MantralayNewsDetails.aspx?str=cg/yiuO80WlNpI88Mc8kUg==. 2019-02-06 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)