विद्युत विस्थापन क्षेत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भौतिकीत विद्युत विस्थापन क्षेत्र, हे मॅक्सवेलच्या समीकरणांत आढळणारे एक सदिश क्षेत्र परिमाण असून ते \mathbf{D} ने दर्शविले जाते. हे द्रव्यातील मुक्त प्रभाराचे परिणाम परिमाणात धरते. "डिस्प्लेस्मेंट" (म्हणजेच "विस्थापन") ह्या अर्थाने "D" वापरलेला आहे. मुक्त अवकाशात विद्युत विस्थापन क्षेत्र हे प्रवाह घनते इतकेच असते.

व्याख्या[संपादन]

पराविद्युत द्रव्यात विद्युत क्षेत्र E च्या प्रभावाखाली द्रव्यातील (आण्विक केंद्र आणि त्यांचे विद्युत्कण) बंदिस्त प्रभार हे स्थानिक विद्युत द्विध्रूव जोरासहित काहीसे लांब होतात. विद्युत विस्थापन क्षेत्राची व्याख्या अशी:

\mathbf{D} \equiv \varepsilon_{0} \mathbf{E} + \mathbf{P},

येथे \varepsilon_{0} ही अवकाश पारगम्यता (किंवा मुक्त अवकाशाची पारगम्यता), आणि P हे (स्थूलमानाने) ध्रुवीकरण घनता म्हणजेच कायमस्वरूपी आणि प्रस्थापित विद्युत द्विध्रुव जोराची घनता.