विक्रम नाथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विक्रम नाथ

कार्यकाळ
३१ ऑगस्ट, २०२१ – कार्यरत
पुढील विद्यमान
सुचविणारे एन.व्ही. रमणा
नेमणारे राम नाथ कोविंद

कार्यकाळ
१० सप्टेंबर, २०१९ – ३० ऑगस्ट, २०२१
सुचविणारे रंजन गोगोई
नेमणारे राम नाथ कोविंद

कार्यकाळ
२४ सप्टेंबर, २००४ – ९ सप्टेंबर, २०१९
सुचविणारे रमेश चंद्र लाहोटी
नेमणारे ए.पी.जे. अब्दुल कलाम

जन्म २४ सप्टेंबर, १९६२
कौशंबी जिल्हा, उत्तर प्रदेश, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
पत्नी संगीता श्रीवास्तव
अपत्ये विश्वेश नाथ, वरद नाथ
शिक्षण कायदा पदवी

विक्रम नाथ (२४ सप्टेंबर, १९६२:कौशंबी जिल्हा, उत्तर प्रदेश, भारत - ) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. याआधी ते गुजरात उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश [१] [२] आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून शिफारस करण्यात आली होती परंतु केंद्र सरकारने या शिफारसी नाकारल्या. [३] २०२० च्या कोव्हिड-१९ साथीच्या काळात यूट्यूबवर आपल्या न्यायालययाची कार्यवाही थेट प्रसारितत करणारे ते भारतातील उच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश आहेत.

३१ ऑगस्ट, २०२१ रोजी त्यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशपदी वर्णी लागली. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या निवृत्तीनंतर ते २०२७ मध्ये भारताचे सरन्यायाधीश होण्याच्या मार्गावर आहेत. [४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Singh, Ajmer (2019-08-31). "Collegium clears Vikram Nath's name for Gujarat High Court Chief Justice". The Economic Times. 2019-09-02 रोजी पाहिले.
  2. ^ "Orders of appointment of Shri Justice Vikram Nath, Judge of Allahabad High Court, to be CJ of Gujarat High Court (08.09.2019)" (PDF). 8 September 2019. 8 September 2019 रोजी पाहिले.
  3. ^ Emmanuel, Meera (10 April 2019). "Collegium recommends Justice Vikram Nath as First Chief Justice of Andhra Pradesh HC". Bar & Bench. 10 April 2019 रोजी पाहिले.
  4. ^ "Next 9 Chief Justices of India". Supreme Court Observer (इंग्रजी भाषेत). 2023-03-12 रोजी पाहिले.