विकिपीडिया चर्चा:चावडी/ध्येय आणि धोरणे/प्रचंड प्रस्ताव

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@अभय नातू, V.narsikar, आणि Tiven2240:, भाषांतर करताना शीर्षक चुकले आहे असे वाटते. प्रचंड हे संकीर्ण/एकत्रित असे काही तरी असावे. प्रत्येक धोरणाचा एकमेकाशी संबंध असणारच. तरीही प्रक्रियेच्या दृष्टीने प्रत्येक प्रस्तावासाठी स्वतंत्र पान करायला हवे. मत देताना, चर्चा करताना गल्लत होऊ शकते.आधीच मोजकेच लोक चर्चेत सहभागी होतात, त्यामुळे प्रत्येक प्रस्तावाची स्वतंत्र तटस्थ,निष्पक्ष चर्चा होण्यासाठी हे एका पानावर नसावे असे वाटते. शिवाय एकेक मुद्दा हातावेगळा करण्यासाठीही हे आवश्यक आहे. उदा.कौल प्रक्रियेतील महत्वाचे धोरण कौल देण्यास पात्रता हे आहे, कौल मुदतीनंतर. क्र. एक व चार हे प्रस्ताव सदस्यांशी निगडीत आहेत - सदस्य खाते व सदस्य अधिकार धोरणे. स्वतंत्र पानावरील चर्चा साठविण्यासाठी उपयुक्त ठरेल आणि सुसूत्रता येईल. कृपया आपले मत द्यावे आणि पुढील कारवाई करावी.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १८:२१, ९ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]

@सुबोध कुलकर्णी:

आपले म्हणणे रास्त आहे असे प्रथमदर्शनी वाटत आहे.बिग प्रपोझलचे हे मराठीकरण असावे.नेमके त्यांचे मनात काय आहे हे तेच सांगू शकतात.सदस्य टायवेन यांना या प्रकरणी खुलासा करू द्यावा.प्रत्यकासाठी स्वतंत्र पान असावे हे मान्य.@Tiven2240: कृपया आवश्यक कार्यवाही करावी ही विनंती.--वि. नरसीकर , (चर्चा) २२:३४, ९ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]

@Tiven2240:, आपण ही काही महत्वाची धोरणे चर्चेसाठी मांडली होती. वर वि. नरसीकर यांनी अनुमोदन दिल्याप्रमाणे प्रस्तावाची पुनर्रचना करून मांडण्याचा आपला विचार आहे का ते कळवावे.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:५९, १७ डिसेंबर २०१८ (IST)[reply]