वा.ना. अभ्यंकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्राचार्य वामन ना. अभ्यंकर ऊर्फ भाऊ अभ्यंकर हे निगडी, पुणे येथील ज्ञान प्रबोधिनी मातृमंदिर-गुरुकुलांमधील शिक्षक होते. त्यांनी काही शैक्षणिक पुस्तके लिहिली आहेत. ते पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीचे ६ वर्षे उपप्राचार्य आणि ९ वर्षे प्राचार्य आणि ३०हून अधिक वर्षे निगडी ज्ञानप्रबोधिनीचे केंद्रप्रमुख होते. ते मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे कार्यवाह आणि पंचकोशाधारित गुरुकुलाचे संस्थापक होते.

वा.ना. अभ्यंकर हे प्रवचनकार होते. त्‍यांची २०हून अधिक भागवत सप्ताहांमध्ये प्रवचने झाली आहेत.

वा.ना. अभ्यंकर तथा भाऊंचे दिनांक ग्रेगोरियन १६ फेब्रुवारी २०२१ रोजी वयाच्या ७९ व्या वर्षी राहत्या घरी दुःखद निधन झाले.

पुस्तके[संपादन]

  • एकविसाव्या शतकासाठी शिक्षण
  • चिंतनिका
  • नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अनमोल मार्गदर्शिका
  • नेतृत्वाचे पैलू
  • पंचकोश विकसनातून शिक्षण
  • स्पर्धा परीक्षा गणित

सन्मान आणि पुरस्कार[संपादन]

  • बाबुराव ठाकुर शैक्षणिक पुरस्कार. पुरस्कारामध्ये एक लाख रुपये व सन्मानचिन्हाचा समावेश आहे. (२०१४)
  • विश्व विवेक फाउंडेशनचा पुरस्कार (२००३)
  • International Publishing Houseचा Best Citizen of India पुरस्कार
  • कऱ्हाडच्या शिक्षण मंडळाचा साने गुरुजी पुरस्कार
  • अंबरनाथच्या दि एज्युकेशन सोसायटीचा दधिची पुरस्कार
  • पुण्याच्या गीता धर्म मंडळाचा गीतागौरव पुरस्कार
  • टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी. लिट. या पदवीने सन्मानित